B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अनुसूचित जमातीमधील कर्मचारी अधिकारी यांच्या विविध मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरवा करणार – आमदार चिमणराव पाटील

0

अनुसूचित जमातीमधील कर्मचारी / अधिकारी यांच्या विविध मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरवा करणार – आमदार चिमणराव पाटील

पारोळा – अनुसूचित जमातीमधील कर्मचारी / अधिकारी यांच्या सेवाविषयक लाभ व सेवानिवृत्तीचे लाभ १४ डिसेंबर २०२२ या आदेशात सुस्पष्टता व स्वयंस्पष्टता येण्याकरिता तसेच तांत्रिक खंड क्षमापित करून सेवानिवृत्तीपर्यंत अर्हताकारी सेवा धरून, सेवालाभ व सेवानिवृत्ती लाभासाठी शुद्धीपत्रक निर्गमित होणेबाबत आज आमदार चिमणराव पाटील यांची ऑर्गनाईझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह), महाराष्ट्र च्या कर्मचारी / अधिकारी यांनी भेट घेतली. यावेळी अधिसंख्य पदावरील अधिकारी / कर्मचारी यांचा संवेदनशील विचार होवून त्यांना सेवा विषयक तसेच सेवा निवृत्तीचे लाभ देण्याकरिता त्रुटी दूर करून निवेदनात नमूद प्रमाणे शासन निर्णय होणेकामी शासन दरबारी आवश्यक तो पाठपुरवा करणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित कर्मचारी / अधिकारी यांना आश्वाशित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.