B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळा येथे तालुकास्तरीय अधिवेशन प्रसंगी एरंडोल विधानसभा भारतीय जनता पार्टीला सुटावी अशी मागणी…
पारोळा येथे एरंडोल विधानसभा महायुतीतून भारतीय जनता पार्टीला मिळावी माजी उपनगराध्यक्ष मंगेश तांबे पारोळा अविकसित मतदार संघाचा विकासासाठी एरंडोल विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीत महायुतीतून भारतीय जनता पार्टीला सुटावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या पारोळा तालुका स्तरीय अधिवेशनात राजकीय प्रस्ताव मांडताना पारोळा शहराचे माजी नगराध्यक्ष मंगेश तांबे यांनी केली याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा जिल्हा अध्यक्ष मा ज्ञानेश्वर जळकेकर महाराज जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन धरणगाव अधिवेशनाचे प्रमुख वक्ते अमोल पाटील भडगाव माजी खा. ए टी नाना पाटील माजी नगराध्यक्ष गोविंद आबा शिरोळे सुरेंद्र बोहरा अँड अतुल मोरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ,जिल्हा चिटणीस नाना सुखदेव पाटील कृतिका आफ्रे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते अधिवेशनाची सुरुवात दीप प्रजलानाने झाली प्रास्ताविक तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले त्यांनी संघटनेचा आढावा मांडला तर शोक प्रस्ताव शालिक पवार यांनी मांडला अधिवेशनात राजकीय प्रस्ताव मांडताना पारोळा शहराचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश तांबे यांनी देश व महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सध्या स्थितीवर भाषण करताना एरंडोल विधानसभा क्षेत्र प्रश्न व खुंटलेला विकास यासोबत भारतीय जनता पार्टीची एरंडोल विधानसभा क्षेत्रात असलेली तयारी व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एरंडोल विधानसभा क्षेत्र महायुतीतून भारतीय यंदा पार्टीला सुटावा अशी मागणी केली या प्रस्तावाला माजी उपनगराध्यक्ष सुरेंद्र भाऊ बोहरा यांनी अनुमोदन दिले यावेळी अँड अतुल मोरे गोविंदा आबा शिरोळे या मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख वक्ते अमोल नाना पाटील यांनी राज्य केंद्र या सरकारने केलेल्या कामाचा आढावा मांडला व राज्य सरकारने ज्या नवीन योजना काढल्या ते सांगितले तसेच त्यांनी कार्यकर्ते यांना आव्हान केले फेक नेरेटिव जे पसवले जाते त्याचा कार्यकर्ते यांनी योग्य तो संदेश जनते पर्यंत पोहचवावा . मा. खा .ऐ टी नाना पाटील यांनी आपल्या मनोगत आगामी निवडणुका हे महायुती म्हणून लढायचे असून कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावे असे आव्हान केले अधिवेशनाचा समारोप जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जळके कर यांनी केला तर आभार प्रदर्शन जितेंद्र चौधरी सर यांनी मांडले यावेळी पारोळा तालुका भारतीय जनता पार्टी पदाधिकारी गटप्रमुख शक्ती केंद्रप्रमुख सुपर वारीयर्स व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते