B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
आमदार चिमणराव पाटील व मा.अमोलदादा पाटील यांनी केली पारोळा पाणीपुरवठा योजनेची पाहणी…
ऑगस्ट अखेर पर्यंत शहराला ५ ते ६ दिवसाआड पाणी मिळणार, तसेच ऑक्टोबर अखेर पर्यंत शहराला दैनंदिन पाणीपुरवठा होणार – आमदार चिमणराव पाटील
पारोळा शहराचा पाणी प्रश्न हा अतिशय ज्वलंत विषय आहे. शहराचा पाणीप्रश्न हा कायमचाच मिटावा व शहराला शिरपूर प्रमाणेच गुणवत्तेपूर्ण शुध्द पाणीपुरवठा दैनंदिन व्हावा यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सदैव प्रयत्नशील होते. या बाबत आमदार आमदार चिमणराव पाटील यांनी वेळोवेळी योग्य तो आवश्यक पाठपुरावा करत पारोळा शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर करून ५३.७० कोटी रुपयांना मंजुरी मिळवून आणली. या कामाची तातडीने सुरुवात करून शहराला त्वरित पाणीपुरवठा कसा उपलब्ध होईल यासाठी हे काम प्रत्यक्षात सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक आयोजित करीत, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करेपर्यंत अहोरात्र प्रयत्न केले. आज आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर शिंदे, पाणी पुरवठा अभियंता प्रियंका जैन, नगरअभियंता सुमित पाटील, मक्तेदार प्रतिनिधी रंजन महाजन, प्रकल्प सल्लागार प्रतिनिधी हेमंत कोल्हे, गजानन रबाडे, तुषार शिंपी यांचेसमवेत पारोळा शहर पाणीपुरवठा योजनेची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सध्याचे सुरु असलेले काम व सदरील योजना पूर्णत्वास येण्यासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याचा सूचना यावेळी आमदार मा.आबासाहेब चिमणराव पाटील यांनी दिल्या. तसेच आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व मा.अमोलदादा पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत पारोळा शहर पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली. आजअखेर या योजनेचे ७५ ते ८० टक्के काम पूर्णत्वास आले असून शहराला ऑगस्ट अखेर पर्यंत ५ ते ६ दिवसांआड पाणीपुरवठा होणार असून ऑक्टोबर अखेर पर्यंत दैनंदिन पाणीपुरवठा सुरु करण्याचा आमचा मानस असल्याचे यावेळी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी सांगितले.