B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
कन्यारत्न झाल्यामुळे आरोग्य सेवक सचिन पाटील यांनी उमरे मालखेडे या दोन गावात विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
.
कासोदा (सुरेश ठाकरे ,)येथून जवळ असलेल्या उमरे मालखेडा येथील आरोग्यवर्धिनी बहुउद्देशीय संस्था उमरे या संस्थेकडून संस्थेचे अध्यक्ष, आरोग्य सेवक तथा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सचिन पाटील यांना नुकतेच कन्यारत्न जन्मास आल्यामुळे त्यांना फार मोठा आनंद झाला व त्यांनी १५ ऑगस्ट चे औचित्य साधत उमरे मालखेडे या दोन गावांतील जिल्हा परिषद च्या शाळेत शंभर विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करून “एक दप्तर मोलाचे”हा उपक्रम त्यांनी राबवला आहे. असे एक ना अनेक उपक्रम ते गेल्या सात आठ वर्षापासून राबवत आहेत. पहिल्या वेळेस त्यांनी जिल्हा परिषद शाळेत वृक्ष लागवड , वह्या , पॅड वाटप व शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मेडल वाटपाचे कार्यही केले आहे. यानंतर आता पुढील वर्षी विद्यार्थ्यांना टॅब देण्याच्या त्यांचा मानस असून यामुळे उमरे मालखेडे जिल्हा परिषद शाळा ही डिजिटल होण्यास मदत होईल या उदात्त हेतूने हे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमात ह.भ.प श्रीकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप ठाकरे यांनी केले तर मिनल पवार यांनी शेवटी आभार मानले. याप्रसंगी उमरे गावाचे माजी सरपंच आत्माराम पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज पाटील, पोलीस पाटील किरण समाधान पाटील,भवानी शंकर दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन ईश्वर पाटील, भवानी शंकर गटाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, पेन्शनर मुख्याध्यापक आनंदा पाटील ,प्रभाकर पाटील,धुडकु पाटिल,सोगालाल पाटील,मनोहर पाटील,दिपक पाटील, अनिल पाटील,भारत पाटील,गोकुल पाटील,समाधान पाटील ,योगेश पाटील,संदीप पाटील, सतीश पाटील यांच्यासह असंख्य गावकरी याप्रसंगी उपस्थित होते
*सदर दप्तर वाटप करणारे आरोग्य सेवक सचिन पाटील हे एक उत्तम आरोग्य सेवकही आहेत.
सचिन पाटील हे असे सामाजिक कार्यक्रम करत असताना एक चांगले आरोग्य सेवक म्हणूनही कासोदा आणि परिसरात सुपरीचीतआहे. त्यांनी परिसरातील अनेक गरजू रुग्णांना मुंबई येथे घेऊन जाऊन हिंदुजा, के ई एम, जे जे हॉस्पिटल मध्ये अनेकांना आरोग्य सेवक म्हणून आपली सेवा बजावली आहे. त्यांनी अनेक रुग्णांचे मोठे मोठे ऑपरेशन करून रुग्णांना दुरुस्त करून घरी आणले आहे हे एक विशेष.