B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

.निवडणूक आधी महिलांना दिलेले हे चॉकलेट आहे , सरकार महाविकास आडीचेच येणार – खा . सुप्रिया सुळे

0


पारोळा – महाराष्ट्रचे धास्तवलेल्या सरकारने जुन्या सर्व योजना बाजुला सारुन लाडकी बहिण योजना सुरु करुण बहिणीच्या खात्यावर पैसे टाकलेले आहे ते लवकर काढून घ्या कारण ह्या घाबरलेल्या सरकारचं काहि खरं नसल्याचे सांगत पैश्याने बहिण भावाचं नात विकत घेतले जात नसुन पैश्याने पक्ष फोडले जातात नाती नव्हे असे सांगत खोक्याच्या सरकारने स्वाभिमान गहाण ठेवला असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला .
पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या .
मेळाव्याच्या व्यासपिठावर माझी पालकमंत्री गुलाबराव देवकर महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी , माजी आमदार दिलीप सोनवणे रावेरचे श्रीराम पाटील चोपड्याचे चंद्रकांत बारेला डॉक्टर संजय पाटील विकास पवार जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील , कृउबा समिती सदस्या रेखा पाटील , सौ वर्षा पाटील , डॉक्टर शांताराम पाटील , आदि मान्यवर उपस्थित होते .
खासदार सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाला की राज्यात बेरोजगारी समस्या मोठया प्रमाणात आहे अनेक कंपण्या गुजराथ मध्ये स्थलांतरित झाल्या तर महाराष्ट्राचे युवक बेरोजगार झाल्याचा आरोप करीत महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न अहिराणी वर आला आहे . अमरावतीचे आमदार रवी राणा यांचे नाव न घेता भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा एक आमदार म्हणाले होता की तुम्ही आम्हाला मतदान नाही केला तर तुमचे पैसे आम्ही काढून घेऊ अरे फक्त एका महिलाचे पैसे तर काढून दाखव असा दम भरत महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये एकाच वेळी इलेक्शन होत असत परंतु यावेळी जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा च्या निवडणुका एक वेळा घेऊन हया सरकारने महाराष्ट्राच्या निवडणुका लांबनीवर टाकले असल्याचा आरोप केला .
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीला घरातला उमेदवार उभा करून माझी मोठी चूक झाल्याचं विधान केलं होतं त्याचा समाचार घेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांची सध्या कोर्टात नैतिकतेची लढाई सुरू आहे आम्हाला सत्यापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे असे सांगत आमची लढाई ही दिल्लीच्या अदृश्य शक्तीशी असल्याचे सांगत फोडाफोडीच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस आपण काय साध्य केलं असा आरोप करत येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असून शेतकऱ्यांच्या मालाला भाव महिला साठी अनेक नविन योजना आणून कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याचा सांगीतलं
तर माझी पालकमंत्री डॉ सतीश पाटील म्हणाले की
गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकारणात स्वाभिमानाने राजकारण केले, खोके व गद्दारी करून कधीही मोठा झालो नाही.
पक्षाचे चिन्ह बदलले मात्र जनतेची विचारधारा शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे तेच माझे गळ्यातील मंगळसूत्र असून शेवटच्या श्वासापर्यंत
त्यांच्यासोबत राहील असे भावनिक आवाहन माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी केले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यात व मतदार संघात टक्केवारीने कामे होत असल्याचा आरोप करत जिल्हा सह
एरंडोल विधानसभा क्षेत्रात रस्ते, वीज ,पाणी, मूलभूत समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीमालाला हमीभाव, कापूस प्रश्न, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित आहेत अशा विविध समस्यांकडे आमदारांना वेळ नाही
मात्र टक्केवारी घेण्यात ते पुढे आहेत.
खोके आणि गद्दारी करणाऱ्या आमदारांविरुद्ध आता विधानसभेत
जागा दाखविण्यासाठी सज्ज झालो असून एरंडोल विधानसभेत
अनेक इच्छुकांची दुकाने उघडली आहेत असा मिश्किल टोला लगावत
सत्ताधारी आमदारच पालकमंत्र्यांना घरचा आहेर देतात. त्यामुळे राज्यातील सरकार हे अपयशी असून
महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील सर्व जागा विजयी होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त करत
महिलांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी बचत गटाच्या माध्यमातून
बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून
त्यांना स्वावलंबन
करण्यासाठी प्रयत्न करावेत
अशी विनंती करत पक्षाने मोठ्या केलेल्या अमळनेरचा आमदार
आता गद्दार झाला असल्याचा टोला
यावेळी माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी लगावला. तर वर्षा पाटील यांचं समयोजित भाषण झालं
या वेळी पराग पवार मंजुषा देसले वर्षा शिंदे हरिष पाटील कपिल चौधरी राजेंद्र देसले विद्या अहिरे सुनंदा शेडे , सुवर्णा पाटील शेख अजिज शेख बारीर संतोष महाजन जितेंद्र पाटील सुवर्णा महाजन कपिल पवार दीपक महाजन एडवोकेट स्वाती शिंदे योगेश रोकडे अनिसा पिंजारी कैलास पाटील सय्यद अहमदाबाद जाफराली महमूद पठाण रवींद्र पाटील महेश भोई आदि उपस्थित होते …

Leave A Reply

Your email address will not be published.