B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिवसेना कार्यालय पारोळा येथे आज विविध मागण्यांचे निवेदन दिले.

0

पारोळा येथील निरंकार सेवा पीठ, मसाला, भात, गिरणी मालक कामगार महासंघाच्या पारोळा शाखेतील पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांना शिवसेना कार्यालय पारोळा येथे आज विविध मागण्यांचे निवेदन दिले.
संघटित पीट,मसाला, पापड, भात गिरणीना शेतीपुरक गृह उद्योगात घेऊन अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करावे,
गिरणी चालकाचा शेतीचा जोडधंदा असल्याने शेतक-याप्रमाणे विना कनेक्शन व सौर उर्जा मिळावी, बांधकाम कामगाराप्रमाणे संघटीत  गिरणी कामकारांना शासनाच्या सवलती मिळाव्यात,कोरोनाच्या काळात संसर्ग होऊन अनेक पीठ गिरणी मालक व कामगार आपल्या जीवाला मुकले आहेत. तरी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, संघटीत  गिरणी वीज ग्राहकांच्या कामगारांच्या कुटुंबास विमा संरक्षण मिळावे, संघटीत, गिरणी कामगारांसाठी आर्थिक महामंडळाची नियुक्ती करावी, संघटीत कामगार म्हणून औषध उपचाराची व्यवस्था शासनामार्फत मोफत व्हावी, वय वर्षे ५० नंतर मानधन योजना राबवावी आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या असून सदर मागण्या विधानसभेत मांडून गिरणी लालक व चालक यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी संस्थापक/अध्यक्ष  अशोक  सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा तालुका अध्यक्ष संदिप विलास देवरे, उपाध्यक्ष  दिनेश नथ्थु हजारे,सचिव
जयेश पुंडलीक बागुल,कार्याध्यक्ष कृष्णकांत प्रल्हाद पवार,कोषाध्यक्ष संतोष भास्कर चौधरी,सहसचिव प्रशांत अनिल कुलकर्णी,संपर्क प्रमुख  अमृत रघुनाथ माळी, सहसंपर्क प्रमुख संजय बाबुराव जाधव,संघटक अनिलनिंन बवननिंग परदेशी, ज्ञानेश्वर भाऊलाल चौधरी,
प्रसिद्धी प्रमुख मनोहर हिरालाल पाटील,
सल्लागार. प्रविण भानुदात्त मुंदाणकर, उदयभान गोकूळ पाटील यासंह  निरंकार सेवा पीठ, मसाला, पापड, भात गिरणी मालक व कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.