B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पारोळा तालुका महाविकास आघाडीतर्फे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मुक आंदोलन

0


पारोळा ता पारोळा आज दि.२४ ऑगस्ट रोजी
पारोळा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर सह राज्यात विविध ठिकाणी अल्पवयीन मुली व महिला यांच्यावरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याबाबत निषेध करण्यासाठी तसेच या असंवेदनशील सरकारचा निषेध करण्यासाठी आज माजी पालकमंत्री आण्णासाहेब डॉ सतीशरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला काळ्याफिती बांधून मूक आंदोलन करण्यात आले. दिनांक २४ऑगस्ट रोजी राज्यभर महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करता येणार नाही असा निकाल दिल्याने शरद पवार यांनी उच्च न्यायालयाचा व संविधानाचा आदर करत महाराष्ट्रातील बंद मागे घेण्याचे आवाहन केले व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी हा बंद मागे घेतला बंद जरी मागे घेण्यात आला असला तरी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर तोंडाला काळ्याफिती बांधून मूक आंदोलन केले जाईल असे जाहीर केले बदलापूर सारख्या अमानवीय घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने वत्याबाबत सरकार कोणत्याही प्रकारचे ठोस पावले उचलत नसल्याने या घटनेचा निषेध करण्यासाठी व या संवेदनशील सरकारचा निषेध करण्यासाठी आज पारोळा येथे मूक आंदोलन करण्यात आले यावेळी पारोळा तहसिलदार व पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एरंडोल विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ शांताराम नाना पाटील तालुकाध्यक्ष संतोष महाजन सर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरण अनुष्ठान. , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख प्रा.आर बी पाटील सर, जि प सदस्य रोहन दादा पाटील, जि प सदस्य हिम्मत आबा पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितेंद्र पाटील राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष योगेश रोकडे गणेश पाटील ईश्वर पाटील मुंदाणे सरपंच संदीप पाटील सर ललित सोनवणे लोकेश पवार भैय्यासाहेब माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.