B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
एकाच दिवशी ८००रोपांचे, खड्डे खोदून व लोखंडी जाळीचे ट्रिगार्ड लाऊन वृक्षारोपण
कासोदा (सुरेश ठाकरे). येथे ग्रीन आर्मीचा ऐतिहासिक उपक्रम
वृक्षारोपण काळाची ही गरज- प्रांताधिकारी -गायकवाड
कासोदा-कोरोना काळात बंद झालेले येथील ग्रीन आर्मीचे काम पून्हा उत्साहात सुरु झाले असून दि.२९रोजी एकाच दिवशी ८००रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे,या उपक्रमाचा शुभारंभ एरंडोलचे प्रांताधिकारी मनिष गायकवाड व सपोनि निलेश राजपूत यांचे हस्ते संपन्न झाला आहे.
कोणती ही शासकीय मदत न घेता लोकवर्गणीतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज असून कासोदा ग्रीन आर्मीचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार गायकवाड यांनी या वेळी काढले,या उपक्रमासाठी त्यांनी दहा हजार रुपयांची मदत देखील केली आहे.
प्रास्ताविकात कासोदा ग्रीनआर्मीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली.
व्यासपिठावर मनिष गायकवाड,सपोनि निलेश राजपूत,सरपंच पुरुषोत्तम चौधरी, लताबाई मोरे,भास्कर चौधरी,राजेंद्र ठाकरे, पी.एल. मोरे,अजीज बारी, डा.टावरी, सुनिल पाटील,समाधान पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिपक पाटील सह ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते,यांचे स्वागत ग्रीन आर्मीच्या वतीने करण्यात आले.
गावातील पर्यावरण प्रेमी तरुणांनी एकत्र येऊन वृक्षारोपण चळवळ उभी केली आहे,कासोदा ते एरंडोल या राज्यमार्गाच्या दूतर्फा सुमारे दोन ते तीन कि.मी.अंतरापर्यंत खड्डे खोदून वृक्षारोपण करण्यासाठी नियोजन करण्यात आले,डिसेम्बर महिन्यानंतर ड्रिपद्वारे पाणी देण्याचे देखील नियोजन करण्यात येत आहे.
कोणतीही शासकीय मदत न घेता लोकवर्गणीतून खर्चिक असे लोखंडी ट्रिगार्ड लाऊन एकाच दिवशी ८०० रोपांची लागवड होत असलेला ऐतिहासिक उपक्रम ग्रीन आर्मीच्या टिमने घडवून आणल्याबाबत पर्यावरण प्रेमींकडून कौतुक होत आहे.
या आधी शोशलमिडीयात एक गृप तयार करण्यात येऊन दररोजच्या घडामोडी सदस्यांना कळविण्यात येत होत्या,या गृपच्या माध्यमातून दाते निर्माण होत गेले,कासोदा ग्रामपंचायतने सुमारे ३५० ट्रिगार्डची याकामी मदत केली, तसेच विखरण गावाजवळील रोपवाटीकेतून त्यांचेच ट्रक्टर व कर्मचाऱ्यांनी रोप आणून दिलीत,राहूल सोनवणे या जळगाव येथे नोकरी करीत असलेल्या तरुणाने रोपांसाठी लागणारे खड्डे जेसीबीच्या सहाय्याने स्वखर्चातून खोदून दिलेत,म्यानमार येथून सचिन बियाणी या तरुणाने दहा हजार रुपये तर पूण्यातील चंद्रशेखर गोसावी या तरुणाने ११५००/- रुपये ट्रिगार्डसाठी मदत पाठवली,ए.डी.पगारे यांनी पांच हजार रुपयांची मदत पाठवली, कल्याण पाटील यांनी ट्रिगार्ड रस्त्यावर आणण्यासाठी आपला ट्रक दिवसभरासाठी ग्रीन आर्मीला दिला होता, सामाजिक वनिकरण विभागाने रोपं मोफत पुरवली,य उपक्रमामुळे प्रभावित होऊन मनिष गायकवाड यांनी देखील याकामी दहा हजार रुपयांची मदत दिली आहे.
सुत्रसंचालन संजय जमादार यांनी केले,तर राहूल सोनवणे यांनी आभार मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदिप वाघ, राहुल मराठे,निलेश अग्रवाल, शैलेश पांडे, स्वप्नील बियाणी, राहुल सोनवणे,यशवंत राक्षे, उमेश नवाल डॉ . महेंद टावरी, बापू सोनवणे व सहकार्यानी परिश्रम घेतले.