B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विजया दशमीच्या मुहुर्तावर पारोळा शहरात २२५ कोटींच्या विविध विकासकामांचे भव्य भुमीपुजन व लोकार्पण दिमाखात संपन्न…

0

विजया दशमीच्या मुहुर्तावर पारोळा शहरात २२५ कोटींच्या विविध विकासकामांचे भव्य भुमीपुजन व लोकार्पण दिमाखात संपन्न…

पारोळा – शहराचा सर्वांगिण विकासासाठी आणि शहर सुंदर व स्वच्छ साकारण्यासाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांतुन व दि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या दुरदृष्टीने आजवर ३०० हुन अधिक कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

यात लहान मोठ्या समाजांना सामाजिक सभागृहे, केमिस्ट भवन, जलतरण तलाव, अद्ययावत नाट्यगृह, क्रिडा संकुल, पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार प्रकल्प, थोर महापुरूषांचे पुतळे व परिसर सुशोभिकरण, चौक सुशोभिकरण, विद्युतीकरण, दळणवळणासाठी शहरातुन इतर ठिकाणी जाण्यासाठी रस्ते, धार्मिक स्थळांना सोयी-सुविधा यांसह अनेकानेक कामे आज मंजुर झाली आहेत.

महायुती सरकार स्थापन झाल्यापासुन आजवर एरंडोल विधानसभा मतदारसंघात २७०० हुन अधिक कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली. यातुन बरिचशी कामे पुर्ण झाली, काही कामे सुरू आहेत तर काही कामांचे भुमीपुजन करून ती कामे देखील प्रत्यक्षात सुरू होत आहेत.

पारोळा बदलतयं ही संकल्पना मा.अमोलदादा पाटील यांनी राबवुन शहराचा वैभवात भर घालणारी, गेल्या स्वातंत्र्य काळापासुन न भुतो न भविष्यती अशी विकासकामे शहरात होत असतांना आपण पाहत आहोत. इतर शहरांप्रमाणे पारोळा शहर देखील विकासकामांचा आधारे आदर्श शहर साकारावे, शहरातच अद्ययावत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या ही दुरदृष्टी पारोळा बदलतयं या संकल्पनेतुन अवतरत आहे.

आज पारोळा शहरातील १) भाजीपाला मार्केट विकसित करणे. – ०३.०० कोटी (लोकार्पण), २) पारोळा शहरालगत चौधरी समाजासाठी सभामंडप बांधकाम करणे. – २५.०० लक्ष (भुमीपुजन), ३) पारोळा नगरपरिषद हद्दीत बौध्द विहाराचे बांधकाम करणे. – ३५.०० लक्ष (भुमीपुजन), ४) पारोळा नगरपरिषद हद्दीत सिध्दार्थ नगर येथे प्रवेशव्दार बांधकाम करणे. – १०.०० लक्ष (भुमीपुजन), ५) पारोळा नगरपरिषद हद्दीत योगा प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम करणे. – ४०.०० लक्ष (भुमीपुजन), ६) पारोळा ते कजगांव रस्ता कि.मी.२३/७०० ते ५९/९०० ची सुधारणा करणे. – १९७.८३ कोटी (भुमीपुजन), ७) पारोळा नगरपरिषद हद्दीत उंदीरखेडे रस्त्यालगत (मातंग समाज) म्हसनवट विकसित करणे. – १५.०० लक्ष (भुमीपुजन), ८) पारोळा नगरपरिषद हद्दीत कजगांव चौफुली विकसित करणे. – ३०.०० लक्ष (भुमीपुजन), ९) पारोळा नगरपरिषद हद्दीत शिवाजी विभाग बारी गल्ली येथे रस्ता विकसित करणे. – ०५.०० लक्ष (भुमीपुजन), १०) पारोळा नगरपरिषद हद्दीत श्री मोठे श्रीराम मंदीर चौक येथे रस्ता विकसित करणे. – ०५.०० लक्ष (भुमीपुजन), ११) पारोळा नगरपरिषद हद्दीत शेवळे गल्ली भागात रस्ता विकसित करणे. – ०५.०० लक्ष (भुमीपुजन), १२) पारोळा नगरपरिषद हद्दीत गुरव गल्ली भागांत सामाजिक सभागृह बांधकाम करणे. – ५०.०० लक्ष (भुमीपुजन), १३) पारोळा नगरपरिषद हद्दीत शिवाजी व्यायामशाळा येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे. – ५०.०० लक्ष (भुमीपुजन), १४) पारोळा बसस्थानक येथे परिसराचे काँक्रीटीकरण करणे, हिरकणी कक्ष बांधणे, पेव्हर ब्लॉक बसविणे यांसह विविध विकासकामे करणे. – ०३.०० कोटी (लोकार्पण), १५) पारोळा नगरपरिषद हद्दीत बसस्थानकाचा पाठीमागे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम करणे. – ०६.८० कोटी (भुमीपुजन), १६) पारोळा नगरपरिषद हद्दीत तांबे नगर, डि.डि.नगर व दामु आण्णा नगर येथे खुला भुखंड विकसित करणे व दामु आण्णा नगर भागांत केमिस्ट भवन उभारणे. – ०१.५० कोटी (लोकार्पण), १७) पारोळा नगरपरिषद हद्दीत बसस्थानक पाठीमागील नाला बांधकाम करणे. – ०१.४५ कोटी (भुमीपुजन), १८) पारोळा नगरपरिषद हद्दीत श्री मोठे श्रीराम मंदीर पाठीमागील अमळनेर रोड कडे जाणारा नाला बांधकाम करणे. – ५८.०० लक्ष (भुमीपुजन), १९) पारोळा नगरपरिषद हद्दीत एन.ई.एस. हायस्कुल पाठीमागील कृषि उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा नाला बांधकाम करणे. – ६६.०० लक्ष (भुमीपुजन), २०) पारोळा शहरातील भुईकोट किल्ला येथील खंदकाचे पुनरूज्जीवन व सुशोभिकरण करणे. – ०४.९७ कोटी (भुमीपुजन), २१) पारोळा नगरपरिषद हद्दीत तालुका क्रिडा संकुलाचे नुतनीकरण करणेसह इतर विकासकामे करणे. – ०४.०० कोटी (लोकार्पण) या एकुण २२५ कोटींच्या विविध विकासकामांचा भव्य भुमीपुजन व लोकार्पण सोहळा आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते व मा.अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

प्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, शेतकी संघाचे संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखारामनाना चौधरी, मा.नगराध्यक्ष सुरेंद्रभाऊ बोहरा, मा.उपनगराध्यक्ष कैलासभाऊ चौधरी, मा.सभापती अरूणआबा पाटील, उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, मा.शहरप्रमुख आण्णा चौधरी, संचालक साहेबरावदादा पाटील, भैय्यासाहेब पाटील, शेतकी संघाचे मा.संचालक राजेंद्र पाटील, ढोली सरपंच वाल्मिक पाटील, वाघरे सरपंच रावसाहेब पाटील, सावरखेडे मा.सरपंच राजु पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, मा.नगरसेवक भिमराव जावळे, राजु कासार, कैलास पाटील, योगेश पाटील, उपशहरप्रमुख मन्साराम चौधरी, बांधकाम व्यावसायिक पी.आर.वाणी, विलास वाघ, विनोद पाटील, राजु पाटील, पंकज मराठे, बापु मराठे, गौरव अहीरे, कुंदन पाटील यांचेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, तेली समाज पंच मंडळ व नवयुवक मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, समाज बांधव, केमिस्ट असोसिएशन आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, फर्टीलायझर्स असोसिएशनचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, व्यापारी बांधव व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.