B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
टायगर इंटरनॅशनल स्कूल मध्ये किर्तीवंत व गुणवंत मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना दिले प्रगतीचे धडे
पारोळा () पारोळा तालुक्यातील खेळातून शिक्षण क्षेत्रात एक पाऊल नेहमीच पुढे टाकत असलेले आई सत्यभामा फाउंडेशन संचलित टायगर इंटरनॅशनल स्कूल मध्ये आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 रोजी पारोळा शहरातील व परिसरातील गुणवंत किर्तीवंत व सांस्कृतिक वारसांची जाण करून देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शैक्षणिक क्षेत्रामध्ये पारोळा शहरातील बालाजी विद्या प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश करोडपती सर, नुकतेच कोल्हापूर येथे समाज विभूषण म्हणून सन्मानित करण्यात आलेले शिरसमणी येथील रहिवासी व सध्या स्थित देवगाव येथे आपली सेवा करत असलेले डॉक्टर प्रशांत पाटील, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केलेले, आणि कार्यक्रमाच्या आकर्षण ग्रामीण भागातून एमपीएससीच्या माध्यमातून ज्यांची महसूल विभागात निवड झाली असे हिवरखेडा येथील लक्ष्मण पवार, वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारे चोरवड येथील राहुल जोशी, सोबतच भोंडण गुरुदत्त भजनी मंडळाचे गणेश पाटील यांना वारकरी रत्न म्हणून गौरवण्यात आले, तसेच ग्रामीण भागातील मंगरूळ येथील अर्पिता बाळू पाटील जिल्हा नवोदय मध्ये मिळालेले सुयश निमित्ताने तिचे गौरव व सन्मान करण्यात आला
यावेळी टायगर इंटरनेटचा स्कूलच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससीच्या संदर्भात ओळख प्रणाली सादर केले, शासकीय सेवेतील उच्च पदभूषित अधिकाऱ्यांप्रती विद्यार्थ्यांचे प्रेम व महत्वकांक्षी भावना या माध्यमातून समोर आल्या. यावेळी मार्गदर्शनातून ज्यांची नुकतीच महसूल विभागात एमपीएससी द्वारे निवड झाली असे
श्री लक्ष्मण पवार सर यांनी प्रयत्नातून,जिद्द आणि चिकाटीतून महसूल सहाय्यक हे पद सहज मिळते असे बोलून दाखवले, त्यानुरूप विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राचं महत्त्व मिळालं
सामाजिक कार्य करताना गरीब श्रीमंत असा भेदाभेद न करता निखळ मनाने समाजसेवा केल्यावर मी समाजसेवेचे मानकरी कसा झालो हे मला कळलेच नाही असे गौरोद्दगार समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केलेले डॉक्टर प्रशांत पाटील यांनी सांगितले शैक्षणिक सामाजिक आणि व्यावसायिक यासोबतच सांस्कृतिक वारसे महत्वाचे आहे असे मत
गुरुदत्त भजनी मंडळ भोंडण येथील श्री गणेश पाटील व गुरुदत्त भजनी मंडळ चोरवड श्री राहुल जोशी यांना सांगितले त्यानुरूप
टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने
‘वारकरी रत्न’ गौरवण्यात आले. श्री पत्रकार बाळू पाटील यांना सामाजिक कार्यासोबत लोकशाही जिवंत ठेवण्याचा लोक जागृत कार्य स्कूलच्या माध्यमातून केले जाते असे आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातून करोडपती सर यांनी कोणताही राजकीय व शैक्षणिक वारसा नसताना सुद्धा चेअरमन रवींद्र पाटील सर यांनी खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक कार्य केले असे गौरवोद्गार काढले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन विविध आणि चांगलं स्वरूपाचे मार्गदर्शक तुम्हाला नेहमी मिळत असतात अशी ह्यावेळी सांगितले, यानिमित्ताने टायगर इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन रवींद्र पाटील सर यांनी करोडपती आप्पा यांना वाढदिवसानिमित्ताने एक आगळीवेगळी भेट दिली
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता बेडीसकर आणि विश्वास पाटील सर यांनी केले कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन संस्थेचे चेअरमन श्री रवींद्र पाटील सर तसेच कार्यक्रम प्रोत्साहित करण्याचे बल देणारे डायरेक्टर रूपाली पाटील मॅडम,
स्कूलचे प्राचार्य श्रीनिवास राव, अजीम शेख सर, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी, ऍडमिनिस्ट्रेट विश्वास पाटील, विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर, वृषाली पाटील, क्लार्क श्रीकांत खैरनार, सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वीरित्याने पार करणे कामी विशेष सहकार्य केले, कार्यक्रम आलेल्या मान्यवरांचे आभार अजीम शेख सर यांनी मानले