B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कासोदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन पदी संजीव गोपीनाथ नवल यांची निवड

0

कासोदा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन पदी संजीव गोपीनाथ नवल यांची निवड

कासोदा (सुरेश ठाकरे)विविध कार्यकारी सोसायटीची मासिक सभा सकाळी ठीक दहा वाजता सहाय्यक निबंधक कार्यालय एरंडोल चे अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेमध्ये चेअरमन व व्हॉइस चेअरमन यांचा निवडीचा विषय होता चेअरमन पदासाठी संजीव गोपीनाथ नवाल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची चेअरमन परी पदी बिनविरोध निवड करण्यात आली त्यांना सूचक म्हणून आधार वना चौधरी व अनुमोदन अनिल रमेश चौधरी यांनी दिले तसेच व्हॉइस चेअरमन म्हणून तुकाराम जगन्नाथ बाविस्कर यांची निवड करण्यात आली त्यांना सूचक म्हणून विजय धोंडू पाटील व अनुमोदन म्हणून जलालुद्दीन अलीमुद्दीन काजी यांनी दिले सभेसाठी सर्व संचालक उपस्थित होते सभा ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली तसेच संचालक मंडळ मार्फत चेअरमन व चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजित पाटील यांनी कामकाज पाहिले व त्यांना सहकार्य सचिव भगवान किसन कोळी व क्लार्क रवींद्र मोरे यांनी सहकार्य केले

Leave A Reply

Your email address will not be published.