B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पाच हजारांची लाच भोवली ; शासकीय गोदामाच्या अव्वल कारकून सह खाजगी पंटरला अटक
पारोळा प्रतिनिधी |एरंडोल येथील शासकीय गोदामा मधील अतिरिक्त दिलेल्या बारदानाच्या मोबदल्यात 5000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अव्वल कारकून आणि खाजगी भंडारला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे . याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे . यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी आहे . त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय गोदामा मधून बारदान विकत घेण्याचा कंत्राट मिळाला आहे . दरम्यान एरंडोल येथील शासकीय गोदामाचे किपर अव्वल कारकून नंदकिशोर रघुनाथ वाघ वय47 ,रा . एरंडोल यांनी तक्रारदार यांना कंत्राटी प्रमाणे नेमून दिलेल्या बारदान गोडाऊन मधून उचलल्यानंतर अतिरिक्त 7000 नग बारदान त्यांना इच्छा नसताना दिले व त्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची मागणी केली, असे न केल्यास तुझा कंत्राट रद्द करू आणि भविष्यात तुला कंत्राट मिळू देणार नाही असा दम दिला .दरम्यान यासंदर्भात तक्रारदार यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता पडताळणीसाठी सापडा रचला . त्यानुसार तडजोडी अंतिम पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना संशयित आरोपी नंदकिशोर रघुनाथ वाघ वय – ४० ,रा .एरंडोल आणि खाजगी पेंटर हमजे खान मेहमूद खान पठाण वही -39 रा एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ही कारवाई
पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने यांच्यासह अधिक पथकाने कारवाई केली आहे.