B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
रत्नापिंप्री येथे बालाजी महाराजांचा दि. ९ नोव्हेंबर रोजी रथोत्सव
रत्नापिंप्री येथे बालाजी महाराजांचा दि. ९ नोव्हेंबर रोजी रथोत्सव दि.१० नोव्हेंबर रोजी पालखी सोहळा दि.५ ते दि.१० नोव्हेंबर दरम्यान साजरा होणार उत्सव ; भाविकांना दर्शनासाठी खास सुविधा पाच दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनरत्नापिंप्री ता. पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथील श्री माणिक स्वामी आश्रम व गायत्री प्रज्ञापिठतर्फे दरवर्षी गुरुद्वादशी निमित्ताने रथोत्सव साजरा केला जातो सन २०१२ पासून साजरा होणाऱ्या या उत्सवाची यंदा जय्यत तयारी सुरू झाली आहे यात दि.५ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत गावात विविध धार्मिक कार्यक्रमे साजरी होणार आहेत त्यात दि.९ नोव्हेंबर रोजी श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सव तर दि.१० नोव्हेंबर रोजी श्रींच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे माणिक स्वामी आश्रमात ध्वजारोहण गायत्री यज्ञ नाम कीर्तनाने उत्सवाला सुरुवात होईल श्री बालाजी महाराजांच्या यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे श्रींच्या दर्शन घेण्यासाठी सुविधा व्हावी यासाठी विविध उपाय योजना आखली जात आहे उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मंदिर समितीचे सदस्य काळजी घेत आहेत या कार्यक्रमात दि.५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ९ गुरुपूजन व ध्यानधारणा यज्ञ ब्रह्मलीन संत श्री स्वामी पूर्णानंद महाराज यांच्या अवतरण दिनानिमित्ताने सकाळी ९ ते ११ ह.भ.प. सी.एस पाटील( धरणगाव )यांचे प्रवचन होणार आहे दुपारी ११ ते १२ महाआरती विसपुते सोनगिरे परिवार अमळनेर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होणार आहे तर दुपारी ३ वाजता नारी संमेलन आयोजित करण्यात आले आहे दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ९ ध्यानधारणा ,योग साधना ,सकाळी ९ ते १२ पंचकुंडीय महायज्ञ ,संस्कार महोत्सव ,महिला मंडळ संघटन ,भोजन प्रसादाच्या कार्यक्रम होईल दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ९ ध्यानधारणा विचार विनिमय होईल दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ८ ध्यानधारना,८ ते ११ श्रीपाद वल्लभ यांचे स्त्रोत्र पठण होईल ,दि. ९ नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी निमित्ताने श्री बालाजी महाराजांच्या रथाची सजावट सकाळी ११ वाजता महापूजा ,बालाजी महाराजांचे मूर्तीचे पूजन, महाअभिषेक व सजावट केलेल्या रथावर श्रींना विराजमान केले जाईल श्री बालाजी महाराजांच्या रथाचे गावात मार्ग भ्रमण प्रदक्षिणा होईल यासाठी तशी रथ मार्गाची आखणी देखील करण्यात आली आहे तसेच दि.१० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ९ नामस्मरण जप , श्रीपाद वल्लभ यांचे स्रोत्र पठण ,तसेच दुपारी ३ वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे पालखी प्रत्येकाच्या दारासमोर जाणार असल्याने श्रींचे प्रत्येकाला मनसोक्त दर्शनाचा लाभ घेता येणार आहे भाविकांनी दर्शनाचा आणि उत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहेरथोत्सवाची संकल्पनारत्नापिंप्री ग्रामपंचायतीत तीन गावांचा समावेश होतो गावांच्या आजूबाजूला आश्रम, तपोभूमी, मंदिर आहे स्वामी पूर्णानंद महाराज यांनी गावात श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव साजरा व्हावा अशी संकल्पना बोलून दाखवली होती आणि या संकल्पनेचा आदर करीत गुरुद्वादशीच्या ५४ दिवसाच्या आधी रथाच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली. लोकवर्गणीच्या माध्यमातून अवघ्या ५४ दिवसात २१ फूट उंचीच्या भव्य रथाची उभारणी करण्यात आली ११ नोव्हेंबर २०१२ रोजी रत्नापिंप्री ,दबापिंप्री ,होळपिंप्री या तिन्ही गावात प्रथमच रथाची मिरवणूक निघाली रथाच्या उभारणीसाठी भक्तगण आपल्या परीने जी ती मदत देत भव्य रथाची उभारणी करून गावात दिवाळीच्या दिवसात श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या परंपरेला सुरुवात झाली २०१२ पासून तर आज तागायत दिवाळीच्या उत्सवात रत्नापिंप्रीसह परिसरात भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यासाठी श्री माणिक स्वामी आश्रम व गायत्री प्रज्ञा पिठ, श्री बालाजी महाराज संस्थान, रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री पंचक्रोशीतील भाविकांची मदत मिळत असते यावर्षी दि.५ नोव्हेंबर ते दि.१० नोव्हेंबर या पाच दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमासह श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव व पालखी सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे या उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे तरी भाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचा व श्री बालाजी महाराजांच्या यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळविले आहेवृत्तसेवाश्री रामचंद्र पाटीलरत्नापिंप्री ता.पारोळा