B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जळगाव आयोजित राज्यस्तरीय परीक्षेत कासोदा केंद्राचे घवघवीत यश.
कासोदा (प्रतिनीधी सुरेश ठाकरे. }2025 रोजी क. नं. मंत्री माध्यमिक विद्यालयात MTS परीक्षा घेण्यात आली होती. आज रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार कासोदा केंद्राचे एकूण सहा विद्यार्थी गुणवंत यादीत आले आहेत. MTS परीक्षेत एकूण कासोदा केंद्रातून 108 विद्यार्थी सहभागी झाले होते. क. न. मंत्री माध्यमिक विद्यालय, लिटर व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, आर्यन इंटरनॅशनल स्कूल, होली इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल या शाळेतील विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. एमटीएस परीक्षा ही संपूर्ण राज्यात एकच दिवशी आयोजित करण्यात येते . परीक्षा आयोजन करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच एमपीएससी, यूपीएससी, स्पर्धा परीक्षेचा प्राथमिक अभ्यास करण्याची सवय लागावी त्यांचप्रमाणे कमीत कमी वेळात मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण गणित बुद्धीमत्ता यावर आधारित प्रश्नाची उत्तरे द्यावीत हा आहे. परीक्षेतिल गुणवंत विदयार्थी :-
1) 2 रीत आर्णव जिनेंद्र पाटील राज्यात 30 क्र. जिल्हात 20 क्र. व केंद्रात प्रथम,
2) 3 रीत विवेक मनोज चौधरी राज्यात 39 क्र. जिल्ह्यात 29 क्र. व केंद्रात प्रथम,
3)4थीत कुशल दत्तू पाटील राज्यात 32 वा जिल्ह्यात 27 वा व केंद्रात प्रथम,
4) 6 वीत इशांत किशोर चौधरी राज्यात 11 वा जिल्ह्यात 7 वा केंद्रात प्रथम तर लोकेश प्रकाश चौधरी राज्यात 13 वा जिल्ह्यात 9 वा तर केंद्रात द्वितीय,
5) 7 वीत आर्या संदीप पिंगळे राज्यात 30 वा जिल्ह्यात 18 तर केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. सर्वं गुणवंत विध्यार्थी लिटर व्हॅली प्रि-प्रायमरी आणि बालविश्व प्रायमरी स्कुल कासोद्याचे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची माहिती मिळावी सहभाग घेता यावा यासाठी कासोदा केंद्राचे केंद्र संचालक श्री. गौतम सोनवणे सर( क. नं. मंत्री माध्यमिक विद्यालय कासोदा ) यांच्या अथक प्रयत्नांनी एरंडोल येथील केंद्र कासोदा येथे आणण्यात आले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.
महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेचे राज्यस्तरीय संचालक श्री. योगेश राणे सर, कासोदा केंद्राचे केंद्र संचालक श्री. गौतम सोनवणे यांनी गुणवंत विद्याथ्यांचे अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. परीक्षेच्या आयोजनासाठी क. नं. मंत्री माध्यमिक विद्यालयाच्या माजी विदयार्थीनी पर्यवेक्षक म्हणून तर क. नं. मंत्री माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक त्याचबरोबर सर्व शाळेचे मुख्याध्यापक एम.टी.एस प्रतिनिधी यांचे सहकार्य मिळाले.