B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
रत्नापिंप्री नऊ तास बालाजी महाराजांच्या जयघोशात रथोत्सव साजरा
र
पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथे लक्ष्मी रमणा गोविंदाच्या जय घोषात श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव आज मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने साजरा करण्यात आला जवळपास नऊ तास सुरू असलेल्या रथ मिरवणुकीत चौका चौकात भाविकांनी स्वागत करून श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला
श्री माणिक स्वामी आश्रम व गायत्री प्रज्ञा पेठ तर्फे सन २०१२ पासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात असतो गेल्या अकरा वर्ष वर्षापासून श्री बालाजी महाराजांचा रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली आणि या यात्रेचे परिसरात आदर्श ग्रामीण यात्रेचे स्वरूप परिसरात मिळत असते कोरोना काळ वगळता श्री बालाजी बालाजी महाराजांच्या रथोत्सव गेल्या अकरा वर्षापासून थाटात साजरा केला जात आहे प्रारंभी श्री बालाजी महाराजांची पूजा महाभिषेक व आरती पाच यजमानांनी केली यजमान सपत्नीक पुजन रविंद्र रामभाऊ पाटील मंगलाताई पाटील, सोपान रमेश पाटील वैशाली पाटील, प्रदिप दिलीप पाटील भाग्यश्री पाटील,रुपेश तुकाराम मोहिनी पाटील यांच्या हस्ते पूजा बालाजी महाराज रथावर विराजमान करण्यात आले श्री बालाजी महाराजांच्या रथाची सजावट विशेष पद्धतीने करण्यात आली होती या सजावटी त केळीचे खांब, झेंडूच्या फुलांची माळा ,आंब्याचे पानांची सजावट केलेली विविध प्रकारची तोरणे,उस, लायटिंग, रोषणाई करण्यात आली होती याबरोबरच रथावर विराजमान असलेल्या द्वारपाल घोडे, अर्जुन यांच्या देखण्या मुर्त्या रथावर सजावट करण्यात आल्या होत्या रथाच्या मध्यभागी श्री बालाजी महाराज यांची देखणी मूर्ती विराजमान होऊन रथाच्या मार्गक्रमण सुरू झाला रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान भिकनराव पाटील यांना देण्यात आला महापूजा पौराणिक सोमनाथ लोकाक्षी, अमोल उपासणी, कुणाल उपासणी यांनी काम पाहिले श्री बालाजी महाराज दुपारी १२:२० वाजता लक्ष्मी रमणा गोविंदाच्या जयघोषणात जागेवरून हलविण्यात आला हा रथ दबापिंप्री दत्त मंदिर चौक, अहिल्याबाई होळकर चौक ,होळपिंप्री,गृप ग्रामपंचायत चौक, हनुमान मंदिर चौक, दत्त मंदिर चौक ,रत्नापिंप्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, गायत्री माता चौक, बजरंग चौक, येथे आल्यानंतर श्रींचे दर्शन घेण्याकरीता भाविकांसाठी विशेष सुविधा करण्यात आली होती ही मिरवणूक चक्क नऊ तास सुरू होती त्यानंतर रथ परत जागेवर आला भाविकांना दर्शन व आरतीसाठी सवलत देण्यात आली आली होती रथाच्या मार्गावर विविध मंडळाचे विविध पथक ढोल ताशांच्या गजरा सह आपली लेझीम नृत्य सादर करीत होते देखण्या सजावटीसह त्यांचेही आकर्षण दिसून आले खास करून महिला लेझीम पथकाची विशेष कामगिरी या रथोत्सवात पाहण्यास मिळाली या रथोत्सवात तरुणाई नृत्य सादर करताना बेधुंद नाचत होती रथाची जागोजागी पूजन करून महाप्रसादाच्या नैवेद्य दाखवीत होते रथाच्या मार्गावर महिलांनी सडा रांगोळ्या यांचे आकर्षण दिसून आले भाविकांनी रथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या रथोत्सवात ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले ढोल ताशांच्या गजराने उपस्थित त्यांचे लक्ष वेधले होते श्री माणिक स्वामी आश्रमातून ढोल ताशांच्या गजरासह निघालेला जनसामुदाय रथोत्सवात बहुसंख्येने सहभागी झालेला दिसत होता मिरवणुकीच्या लक्षवेधी म्हणजे ढोल ताशांच्या गजरात नृत्य करणाऱ्या त्या तरुणाईचे आकर्षण दिसून आले अरे तो साठी गावा त भव्य यात्रेचेही आयोजन करण्यात आले होते आणि या यात्रेत विविध प्रकारची मिठाई खेळणी विविध संसार उपयोगी वस्तूंची दुकाने मोठ्या थाटात उभारण्यात आलेली दिसून आली पालका झुले यांचेही आकर्षण दिसून आले पारोळा येथील बालाजी संस्थांच्या स्वयंसेवकांनी रथोत्सवाला सहकार्य केले यात बापू बारी,किसन बारी,पांडू बारी,राजू बारी,जीवन बारी, संजय बारी, राजेंद्र बारी,पभा बारी,पका चौधरी, सुभाष भोई,पपू पाटील,सोनू भोई यांनी रथाची मोगरी लावून नियोजन केले भव्य यात्रेचे व श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवा त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच विविध धार्मिक परिजनांनी रतोचा सहभागी होऊन श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाचे व श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला यात विविध मान्यवर जिल्हा परिषद सदस्य रोहन पवार, जिल्हा परिषद सदस्य हिम्मत पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, माजी आमदार स्मिता वाघ ,पारोळा माजी नगराध्यक्ष करण पवार, माजी आमदार शिरीष चौधरी,केसरी सुनील पाटील, सरपंच सुनीता पाटील ,उपसरपंच अधिकार पाटील, माजी उपसरपंच अंकुश भागवत,पंचक्रोशीतील कंकराज, भिलाली कोळपिंप्री कन्हेंरे नेरपाट, चिखलोद, काजीपुरा,सडावण,शेळावे, बोदर्डे ,कन्हेरे ,फापोरे, चाकवे ,भोकरबारी ,पारोळा अमळनेर चोपडा भडगाव धरणगाव तालुक्यातील भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सहाय्यक अभियंता सचिन बागुल , निवृत्ती पाटील, सतीश गोसावी ,अक्षय पाटील, पंकज पाटील ,संदीप गोसावी, योगेश सोनार ,तुषार पाटील, जितेंद्र पाटील ,विनोद धनगर ,सागर चौधरी ,संकेत बडगुजर, काशिनाथ जाधव ,कल्पेश पाटील ,दीपक पाटील ,भूषण पाटील, गोपाल वाघ
यांनी सहकार्य केले यात्रेसाठी विशेष बंदोबस्तासाठी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, प्रवीण पाटील, विनोद साबे,आषिश गायकवाड, सुनील हटकर, संजय पाटील,यांनी चोख बंदोबस्त ठेवला
आज श्री ची पालखी सोहळा
रत्नापिंप्री, दबापिंप्री , होळपिंप्री या तिन्ही गावांना प्रदक्षिणा मारत श्रींच्या पालखीला आज दुपारी ३ वाजेपासून सुरुवात होणार आहे पालखी सोहळ्याने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे पालखी सुरुवातीला श्री माणिक स्वामी आश्रम व गायत्री प्रज्ञापिठातून निघेल रत्नापिंप्री ,दबापिंप्री होळपिंप्री या तिन्ही गावात प्रदक्षिणा करून श्री बालाजी महाराजांची पालखी प्रत्येक घराघरातील व्यक्तींना दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे भाविकांनी पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
वृत्तसेवा
श्री रामचंद्र पाटील
रत्नापिंप्री ता.पारोळा