B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा, “वार्षिक खेळ क्रीडा स्पर्धा- 2023-24 ची जल्लोषपूर्ण सुरुवात
पारोळा शहरातील एकमेव सी.बी.एस.ई शाळेत दर वर्षा प्रमाणे यावर्षी देखील शाळेचा *वार्षिक खेळ क्रीडा स्पर्धा-Annual Sports Meet* सोमवार दी.08/01/2024 पासून सुरू झाल्या. यात विविध क्रीडा स्पर्धांचे वर्ग निहाय आयोजन करण्यात आले आहे. या खेल उत्सव उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून,पारोळा शहराचे न्यायाधीश श्री.एम. काझी साहेब, पारोळा शहराचे तहसीलदार श्री उल्हास देवरे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून क्रीडा ज्योत-मशाल पेटवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेंद्रजी बोहरा, डायरेक्टर डॉ.गौरव बोहरा, श्वेता बोहरा तसेच मुख्य अतिथी म्हणून आर एल कॉलेज चे उपप्राचार्य व क्रीडाआधीक्षक श्री संजय भावसार सर, एसएमसी मेंबर संजयजी शर्मा, साहेबराव महाजन, डॉक्टर दिपाली शेंडे, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री रावसाहेब भोसले सर, सुप्रिया बिऱ्हाडे मॅडम, डॉ. योगेंद्र पवार, डॉक्टर सुवर्णा पवार, शरद रावजी पवार, संदीप धमके, तसेच पत्रकार प्रतीक मराठे, प्रदीप पाटील, योगेश पाटील. आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व पाहुण्यांचे, संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी जोषपूर्ण गीत व नृत्य सादर करण्यात आले नंतर क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनखाली साहसी व चित्त थरारक कसरती, योगा, मल्लखांब कराटे यांचे प्रात्यक्षित सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या क्रीडा सप्ताहात खोखो, कबड्डी, रानिंग, लांब उडी, उंच उडी, रस्सीखेच,हॉकी,बास्केट बॉल, ई. विविध खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशीच्या प्री-प्रायमरी वर्गातील चिमुकल्यांनी स्पर्धेत भाग घेऊन खेळाचा आनंद लुटला व बक्षीसे जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांना मेडल व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मनोगत व्यक्त करताना श्री संजय भावसार सरांनी विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनात अभ्यासा बरोबर खेळाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले व असे उपक्रम शाळेत राबवल्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा व प्राचार्य शोभा सोनी मॅडम व सर्व क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. पारोळा न्यायालय, न्यायाधीश काझी साहेब व तहसीलदार उल्हास देवरे साहेब यांनी कार्यक्रमास उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच पालकांनी देखील उपस्थिती देऊन कार्यक्रमाचे शोभा वाढवली मुलांना प्रोत्साहित केले.सदर कार्यक्रमासाठी *क्रीडा प्रशिक्षक श्री. सत्यनारायण पवार सर, दिनेश सोनिस सर, संतोष कुमार सर यानी विशेष प्रयत्न केले. मल्लखांब या चित्त थरारक सादरीकरणासाठी क्रीडाशिक्षक गणेश काटकर* यांचे विशेष सहकार्य होते. संपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य सौ शोभा सोनी मॅडम, यांचे मोलाचे मार्गदर्शन, इन्चार्ज शिक्षक शिक्षिका व सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अमूल्य सहकार्य लाभले.