B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुंजन सप्तसुरांचे मनोरंजन…!यातील रामायण महानाट्याने केले प्रेक्षकांना मंत्रमुग्ध

0

गुंजन सप्तसुरांचे मनोरंजन…!यातील रामायण महानाट्याने केले प्रेक्षकांना मंत्रमुग्ध

पारोळा: येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा गुंजन सप्तसुरांचे मनोरंजन स्नेहसंमेलनच्या दुसऱ्या दिवशी आगळे वेगळे असे रामायण महानाट्य आयोजीत करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यू.एच.करोडपती तर प्रमूख पाहूणे पारोळा-एरंडोल विधानसभेचे आमदार चिमणरावजी पाटील, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील ,किरण कूवर (जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी)विकास पाटील (जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी) करणदादा पाटील (नगराध्यक्ष पारोळा) चंद्रकांत पाटील (माजी नगराध्यक्ष पारोळा) सचिन भायेकर (जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी) उल्हास देवरे (तहसीलदार पारोळा) किशोर चव्हाण (मुख्याधिकारी न.पा पारोळा) हर्षल माने (संचालक कृ.उ.बा समिती पारोळा)चंद्रकांत सूर्यवंशी (वैद्यकिय अधिकारी पारोळा) विश्वास पाटील (नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी पारोळा) शा. पो.आ अधीक्षक चंद्रकांत चौधरी, सुरेंद्र बोहरा(अध्यक्ष बोहरा सेंट्रल स्कूल)डॉ शांताराम पाटील (अध्यक्ष पीपल एज्युकेशन सोसायटी) डॉ सचिन बडगुजर (सचिव) मंगला करोडपती( संचालिका) डॉ चेतन बडगुजर (सदस्य) प्रा.संजय बडगुजर,पी.जी.पाटील (नगरसेवक) दिपाली माने, राधिका बडगुजर, प्राजक्ता बडगुजर विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील प्राचार्य विजय बडगुजर,प्राचार्य स्वाती बलखंडे उपस्थित होते, या कार्यक्रमाचे उद्घाटक पारोळा-एरंडोल विधानसभा मतदासंघाचे आमदार चिमणराव पाटील व जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्युनिअर केजी सिनियर केजीच्या विद्यार्थ्यानी सुंदर असे नृत्य करुन प्रेक्षकांना आकर्षित केले व त्यानंतर गुंजन सप्तसुरांचे मनोरंजनात महत्त्वाचा गाभा असलेल्या रामायण महानाट्य सुरुवात झाली यात इ १ली ते ७वीच्या एकूण ६८० विद्यार्थांनी सहभाग घेतला यानंतर गुरुकुल की शिक्षात इ २री ते४थीच्या लहान विद्यार्थ्यांनी रामायणातील रामाचे बालपणाचे दर्शन घडवले तसेच गुरु वशिष्टांनी रामाला दिलेली शिकवण तसेच तारकांच्या पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांनी तर प्रेक्षकांना भयभीत केले तसेच स्वयंवर व सीता बिदाई या नाटीकेत तर महिलावर्ग खूप भावुक झाले,राम वनवास नाट्य तसेच पादुका घेऊन जाणारे राजा यांचे दर्शन प्रेक्षकांना मिळाले. सुप्रनखा व झालेला अपमान हे तर खूप सुंदर असे नाट्य विद्यार्थांनी सादर केले त्यानंतर सगळ्यात उठावदार रावणाची एट्रीने प्रेक्षकांची खूप दाद मिळवली त्यांनतर रावण दरबार, सीता हरण,रावण जटायु युद्ध, शबरी हे नाट्य व नृत्य खूप सुंदर झाले अजून महत्त्वाचे आकर्षण म्हणजे पवनपुत्र हनुमान यांची मंचावर एन्ट्री होताच प्रेक्षकांमध्ये उत्साह व आनंद निर्माण झाला प्रेक्षकांमध्ये “बजरंग बली की जय”अशी घोषणा करून जयजयकार कऱण्यात केला यानंतर बाली सुग्रीव युद्ध, सीताअंगुठी ,अशोक वाटिका नाट्य व राम-रावण युद्ध व रामसेतू नाट्य प्रचंड प्रमाणात सुंदर झाले त्यानंतर राम अयोध्यात आलेले राम प्रेक्षकांनी अयोध्येच्या रामाचे दर्शन होऊन काकड आरती झाली असे हे सुंदर रामायण महानाट्य पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले रामायणातील काही निवडक प्रसंग व भावनिक प्रसंग पाहून प्रेक्षकांचे अश्रू अनावर झाले सदर कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या रामायण महानाट्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु.एच.करोडपती सचिव डॉ.सचिन बडगुजर,मंगला करोडपती,डॉ चेतन बडगुजर,राधिका बडगुजर,प्राजक्ता बडगुजर यांनी या नृत्य व नाटिका यांचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील तर सूत्रसंचालन सुजित कंसारा तर संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर यांनी आलेले मान्यवरांचे, पालकांचे व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले या नृत्य व नाटिकाचे नियोजन निकेश राजपूत,मिथुन रॉय व सहकारी यांनी केले श्री बालाजी विद्या प्रबोधिनी शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या रामायण महानाट्य साठी खूप परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.