B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सार्वजनिक माध्यमिक विद्यालय आमदार सत्यजित तांबे यांचे सदिच्छा भेट.

0

सार्वजनिक माध्यमिक विद्यालय आमदार सत्यजित तांबे यांचे सदिच्छा भेट.
कासोदा (सुरेश ठाकरे) येथील शितोळे पंचमंडळ संचलित सार्वजनिक माध्यमिक विद्यालय कासोदा येथे आमदार सत्यजित तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन मा.नरेंद्र पाटील सर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार तांबे यांच्या हस्ते सरस्वती पूजन श्री छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस द्वीपप्रज्वलन केले. प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र शिंदे सर मुख्याध्यापक आर.टी.पाटील (खडके) एस.पी .बोरसे (क.न.मंत्री) बी.एस.पाटील (आडगाव) शेख सर (शहजादी हायस्कूल) मेहमिल सर (एटीटी हायस्कूल) प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सरदार सर गढरी सर (नांदखुर्द) पांडुरंग चौधरी (अर्जुन नगर) हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
आमदार तांबे साहेब, राजेंद्र शिंदे सर, सरोदे सर ,जाधव सर, आदर्शशिक्षक प्रवीण मराठे सर व सर्व सन्माननीय यांचे स्वागत संस्थेचे चेअरमन श्री नरेंद्र पाटील सर, टी.डी.वाघ ,प्रदीप बाविस्कर ,पी.के.पाटील, पी.एस
बोरसे, वाय .डी .सय्यद यांनी केले. उपस्थित मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्या हस्ते आमदार तांबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार तांबे म्हणाले की मला समाजसेवेचा वारसा आजोबा श्री भाऊसाहेब थोरात, वडील डॉक्टर सुधीर तांबे व मामा बाळासाहेब थोरात यांच्याकडून मिळाला.राजकारणात येऊन सामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे , समस्यांचे निराकरण करणे हा उद्देश्य आहे, पदवीधर आमदार असलो तरी शिक्षकांच्या शेतकऱ्यांच्या व कैदी यांच्याही समस्या प्राधान्याने सभागृहात मांडल्या तरच माझे राजकारणात येण्याचे फलिन होईल असे मत व्यक्त केले. संस्थांच्या मागणी चा प्राधान्याने विचार करून अभ्यासिका देण्याचे मान्य केले. कार्यक्रमात बोलताना आ. तांबे यांनी एकूण एक वर्षातील कामाचा लेखाजोखा सांगितला ३७ दिवस अभ्यास दौरा ,३८ दिवस अधिवेशन कामकाज, १५९ दिवस आभार दौरा,७४दिवस मतदार संघ दौरा ,५४ दिवस मंत्रालयीन कामकाज व हजार पेक्षा अधिक शैक्षणिक संस्थांना संगणक वाटप, शासनाच्या विविध योजनातून विविध कामांसाठी दहा कोटी वाटप इत्यादी कामाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.व्ही. बोरसे सर ,प्रास्ताविक वाघ सर आणि आभार पि.के पाटील सर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.