B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
शाळेची वेळ बदलण्यास पालकांच्या नकार
बालाजी विद्यालयात पालक मेळावा संपन्न
पारोळा येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु एच करोडपती, तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील,राधिका बडगुजर पालक प्रतिनिधी म्हणून सुनील पाटील नवल बडकस ज्ञानेश्वर पाटील संतोष चौधरी ईश्वर चौधरी संजय पाटील,दिनेश हजारे,एलचंद पाटील, भैय्यासाहेब रोकडे,धीरज महाजन, विकास चौधरी,प्रसाद वाणी जितेंद्र वानखेडे, प्रविण बडगुजर आदी उपस्थित होते यावेळी पालकांनी आपल्या विविध समस्यांची मांडणी केली त्यावर विविध विषयांवर चर्चा होऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जातात असे सुचित केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी आपल्या पाल्याला योग्य संस्कार देऊन सुजाण नागरिक घडवावे असे पालकांना आवाहन केले यावेळी शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजे नंतर भरण्याबाबत शासन निर्णय यावर चर्चा झाली त्यात पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील पालकांनी वाहतूक व्यवस्था, सकाळ ची वेळ अभ्यासासाठी पुरक असल्याने तसेच शाळेचे दुबार सत्र आदी अडचणी मुळे शासन निर्णयानुसार शाळा दुपार सत्रात भरविण्यास सर्वानुमते नकार देऊन पूर्व प्राथमिक व इ.१ली ते ४थी पर्यंत ची शाळा सकाळी सात वाजेलाच भरवावी असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश करोडपती यांना विनंती केली .पालकांच्या मागणीनुसार प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांची परवानगी घेऊन शाळा सकाळ सत्रातच भरवली जाईल असे आवाहन केले. तसेच यावेळी सन २०२४-२५या शैक्षणिक वर्षासाठी पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात येवून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा , शाळेमार्फत स्कूलबस ची सोय , स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन ,ई-लर्निंग या विषयावर चर्चा होऊन सर्वानुमते मंजुरी देण्यात आली तसेच संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षांचे तयारी घेतली जाईल असे सूचित केले यावेळी विद्यालयाचे शिक्षक सूर्यकांत चव्हाण यांनी पालकांसाठी विविध सूचनांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनेश पाठक ,आभार अश्विनी पिले यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले