B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
अमळनेर बायपास लगत असलेल्या
अशोक नगर रहिवाशांचा गाळ रस्त्यासाठी तहसीलदारांना साकडे
मौजे पारोळा येथील 756 मध्ये जिल्हाधिकारी यांनी पारोळा बिनशेती मंजूर आदेश दिले. तसेच सहायक नगररचना जळगाव यांनी 29 जुलै2004 रोजी लेआउट मंजूर करून प्लॉट बीन शेतीकडे वर्ग केला
मात्र गटाच्या पश्चिम दिशेला गट नंबर 230 व 229 आहे त्यापुढे मुख्य अमळनेर ते पारोळा रस्ता आहे व सदर दोन्ही गट हे नगरपालिका हद्दीत असून सदरचे प्लॉट हे बिनशेतीकडे वर्ग करून तहसीलदार यांनी मंजुरी दिलेली आहे. मात्र पालिकेने अशोक नगर परिसरात राहत असलेल्या नागरिकां बाबत गाळ रस्ता बाबत कोणतीही अंमलबजावणी केली नाही
यासाठी
येथील रहिवाशी धारकांसह महिलांनी
तहसीलदार यांच्याकडे आपली व्यथा मांडून गट नंबर 230 व 229 मधून
गाळ रस्ता मिळावा अशी मागणी केली आहे.
यावेळी तहसील कार्यालयात अशोक नगर रहिवाशीधारकांसह माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील उपस्थित होते.
यावेळी रहिवासीधारकांनी निवेदनात
संबंधित विषयाबाबत पार्श्वभूमी सांगून
बिनशेती केलेले लेआउट मंजूर करताना सदर क्षेत्राचा रस्ता असेल तरच लेआउट मंजूर दिली जाते.
असे सांगितले.
पारोळा गावठाणच्या नकाशामध्ये गाळ रस्ता दर्शविलेला आहे म्हणजे गट नंबर 229 व 230 मधून असा पुढे वंजारी खुर्द गावाकडे गाळ रस्ता आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जळगाव यांनी बिनशेतीचे आदेश दिलेले आहे परंतु नगरपालिका यांनी तो रस्ता गायब करून टाकला. व मनमानी ने तसा लेआऊट मंजूर करून टाकला असे निवेदनात म्हटले आहे
सदर कॉलनीत 300 ते 400 रहिवाशी असून यांच्या विचार करून मुख्य रस्त्यातून रस्ता देण्यात यावा. नगरपालिकेने लेआउट मंजूर करतांना कोणत्याही नियमाचा विचार केला नाही फक्त लेआउट मंजूर केला असल्याचे रहिवासी धारकांनी सांगितले.
चौकट-
म्हसवे शिवारातील रहिवासी धारकांना नगरपालिकेचे पाणी तर अमळनेर रस्त्याकडे नवीन वसाहतधारकांना का नाही?
मौजे म्हसवे शिवारालगत अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या.
या ठिकाणी पालिकेने तीन पट
पाणी पट्टी आकारणी करून त्या ठिकाणी पाणीपुरवठा केला आहे.
मात्र गेल्या अनेक वर्षापासून अंमळनेर बायपास लगत तब्बल सात ते आठ नवीन वसाहती पिण्याच्या पाण्यापासून आहेत. त्यांना पालिकेकडून पिण्याचे पाणी का दिले जात नाही असा सवाल देखील अशोक नगर परिसरातील नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान यावेळी संबंधित विभागाची
बैठक बोलावण्यात येऊन याबाबत
योग्य ती अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते.
छाया -पारोळा – अमळनेर बायपास लागत असलेल्या अशोक नगर परिसरात गाळ रस्ता मिळणे कामी
तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे यांच्याशी चर्चा करताना रहिवासी धारक शेजारी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील