B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळा पत्रकार संघाकडून संवाद यात्रेचे स्वागत व सत्कार
लोकशाहीत पत्रकारांची नितांत गरज – वसंत मुंडे अमळनेर येथे पत्रकार संवाद यात्रेचे अभूतपूर्व उत्स्फूर्त स्वागतअमळनेर प्रतिनिधी सामान्य माणसांना न्याय मिळवून देणारी एकमेव व्यवस्था म्हणजेच माध्यम होय. यामुळेच लोकशाहीत पत्रकारांची नितांत गरज आहे. याची जाणीव सामान्य जनता आणि शासन व्यवस्थेला आहे. मात्र पत्रकारांच्या देखील काही अडचणी आहेत ? त्या सोडवल्या पाहिजेत ? त्यांना देखील आपण सक्षम केले पाहिजे ? ही मानसिकता तयार करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली असल्याचे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अमळनेर येथे संवाद साधताना जाहीर कार्यक्रमातून मत व्यक्त केले.अमळनेर जिल्हा जळगाव येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अभिवादन करून संवाद यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेजवळ विसावली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आयोजित जाहीर कार्यक्रमांमध्ये विविध संघटनांनी पत्रकारांच्या संवाद यात्रेला जाहीर पाठिंबा दिला. अमळनेरच्या मुख्य चौकातून फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात पत्रकार संघाचे किशोर रायसाकडा यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. गांधलीपुरा पोलीस चौकी समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून संवाद यात्रा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळील जाहीर कार्यक्रमांमध्ये रूपांतरित झाली. या जाहीर कार्यक्रमांमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रंथपाल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह बाजार समितीच्या माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तिलोत्माताई पाटील यांच्यासह मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील,शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, काँग्रेस आय पक्षाचे डॉक्टर अनिल शिंदे, काँग्रेस कमिटीचे भागवत सूर्यवंशी, वाल्मिकी समाज उत्थान परिषदेचे गणेश नकवाल, नागराज पाटील, चंदनशिव भाऊ, मराठा सेवा संघाचे मनोहर नाना पाटील, गणेश चव्हाण यासह अमळनेर पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी पुढे बोलताना पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले,शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक साने गुरुजींच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या अमळनेर येथील पत्रकार संघाच्या शाखेचे मी अभिनंदन करतो. सातत्याने सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देणारा हा पत्रकार संघ खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम करत आहे. मात्र हे करत असताना पत्रकारांसमोर अनंत अडचणी निर्माण झालेल्या असताना सुद्धा पत्रकार कधीही आपल्या अडचणी व्यक्त करत नाही. जळगाव जिल्ह्यातील प्रमोद सोनवणे या उमद्या पत्रकाराचे दुर्दैवी निधन झाले. सुदैवाने पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाने पत्रकारांचा विमा काढण्याची योजना राबवली होती. त्यामुळे या दुर्दैवी घटनेमध्ये जीव गमावल्या लागलेल्या सोनवणे कुटुंबियांना दहा लक्ष रुपयांची मदत देखील मिळणार आहे. जर हा विमा काढला नसता तर त्या कुटुंबियांची अवस्था आज काय झाली असती, महाराष्ट्रातील अनेक नामवंत पत्रकार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेली परिस्थिती विदारक आहे. यामुळेच पत्रकार सुद्धा समाज व्यवस्थेतील एक घटक असून तो लेखणीसह मतांची ताकद फिरवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. हेच सरकार आणि व्यवस्था विसरत असल्याने त्यांना जागे करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली असून आपण सर्वांनी पाठिंबा देऊन जो विश्वास दाखवला त्यामुळे नक्कीच पत्रकारांच्या मागण्यांना शासन दरबारी न्याय मिळेल असा मला विश्वास आहे असा आशावाद व्यक्त केला.चौकट…मंगळ ग्रह सेवा संस्थांचा जाहीर पाठिंबा अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर संपूर्ण भारतातील अति प्राचीन, अति दुर्मिळ आणि अति जागृत मंदिरापैकी एक आहे. मंगळ दोषामुळे काहींच्या विवाह कार्यास बाधा येते.येथे येऊन शास्त्रोक्त पद्धतीने दोष काढल्यानंतर अनेकांचे विवाह योग जुळून आल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे या देवस्थानला अन्यन साधारण महत्व आहे.श्री मंगळदेव गृह भूमिपुत्र आहेत. या मंदिरात भारतातील एकमेव भूमी मातेची मूर्ती स्थापित आहे. विश्वातील एकमेव कमंडलूस्थित श्री अनघालक्ष्मी माता दत्त भगवान मंदिर या ठिकाणी आहे. अशा या जाज्वल्य मंगळ ग्रह सेवा संस्थांचे ट्रस्टी श्री दिगंबर कुलकर्णी यांनी पत्रकार संघाच्या वतीने वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सुरू केलेल्या संवाद यात्रेच्या लढ्याला नक्कीच यश मिळेल. पत्रकारांच्या राशीला जो मंगळ ग्रह आलेला असेल तो मंगळदेव दूर करेल आणि एक नवी ऊर्जा देईल असा आशावाद व्यक्त करून जाहीर पाठिंबा दिला. यावेळी श्री मंगळदेव सेवा संस्थांचे पदाधिकारी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने पत्रकार संवाद यात्रेमध्ये सहभागी सर्व मान्यवरांचा यथोचित श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.