B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळा
पारोळा तालुक्यातील भोकर भारी धरणा जवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन असलेल्या पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या बालकांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झला तर दोन जण पाण्यात उतरले नसल्याने ते बचावले असल्याची घटना आज दिनांक तीन रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली वंजारी शिवारात असलेल्या भोकरबारी धरणाजवळ घडली
पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच तरुण हसन रजा न्याय मोहम्मद न्याज वय 16, इजाज रजा न्याज मोहम्मद वय 14, आश्रम पीर मोहम्मद वय 9, इब्राहिम शेख अमीर वय 14 सर्व राहणार बडा मोहल्ला पारोळा ता पारोळा, आवेश रजा शेख मोहम्मद वय 17 रा मालेगाव जि नाशिक, हे पाचही जण आज दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास घरातून पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरवारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज वय 16, इजाज रजा न्याज मोहम्मद वय 14, रा बडा मोहल्ला पारोळा, आवेश रजा शेख मोहम्मद वय 17 रा मालेगाव जि नाशिक येतील धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले विशेष म्हणजे पाचही जणांना कोणालाही पोहता येत नव्हते परंतु फक्त किनाऱ्यावर खेळण्यासाठी उतरलेल्या तिघं तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही त्यामुळे एकापाठोपाठ एक पाण्यात घसरून बुडाले पाण्याच्या जवळ उभी असलेले आश्रम पीर मोहम्मद वय 9, इब्राहिम शेख अमीर वय 14 यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता ते वाचवू शकले नाही दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली घडलेल्या घटनेची आप भीती सांगितल्यानंतर येथील नागरिक व प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचला मात्र उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला होता. यावेळी डॉक्टर प्रशांत रनाडे, डॉक्टर सुनील पारोचे, डॉक्टर गिरीश जोशी,मंगला त्रिवेणी दीपक पाटील प्रमोद सूर्यवंशी प्रेम वानखडे यांनी शवविच्छेदन केले. यावेळी पोलीस निरीक्षक अमळनेर विकास देवरे तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे बाळू गीते, भोकरबारी पोलीस पाटील ज्योती ज्ञानेश्वर बिरारी, शहर तलाठी निशिकांत माने पोलीस हिरालाल पाटील , योगेश शिंदे आकाश माळी सुनील हाटकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, डॉक्टर संभाजी राजे पाटील माजी खासदार एटी नाना पाटील,जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील,यांनी सातवण पर भेट दिली यावेळी डॉक्टर आसिफ कुरैशी,तलाठी भैया निकम, शेख फारुख शेख लतीफ