B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
धरणात बुडून मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयांना माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील कडून आर्थिक मदत
पारोळा येथे तीन ऑगस्ट रोजी भोकरबारी धरणा जवळील पीर बाबांचे दर्शन घेऊन
पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा बुडवून मृत्यू झाल्याची
दुर्दैवी घटना झाली होती.
या घटनेत सदर मृत युवक हे
पारोळा शहरातील रहिवासी होते.
सदर कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती
प्रतिकूल असल्यामुळे माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी सदर कुटुंबीयांचे सांत्वन करून
आर्थिक मदत दिली.
यावेळी महसूल प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करत सदर कुटुंबियांना योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना यावेळी माजी पालकमंत्री डॉक्टर पाटील यांनी दिल्यात.
पारोळा शहरातील बडा मोहल्ला
येथील रहिवाशी नियाज मोहम्मद गयासोद्दीन यांचे परिवारातील इजाज मोहम्मद, मोहम्मद एजाज व त्यांच्या मालेगाव येथील नातेवाईक आवेश मोहम्मद अशा तीन युवकांचा भोकरबारी धरणात बुडून मृत्यू झाला होता. सदर घटना ही अत्यंत दुर्दैवी असून आज देखील सदर परिवार
युवकांच्या दुःखाचा विरह करीत आहे. सदर कुटुंबाची प्रतिकूल परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून
मदत मिळावी यासाठी योग्य तो पाठपुरावा करणे कामी माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी
वार्तालाप केली.
यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल चौधरी,शहराध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष संतोष महाजन .कार्यअध्यक्ष वना महाजन
डॉक्टर अमीन कुरेशी, जुबेर शेख, खलील अहमद, शेख कलीम,प्रमोद पाटील ललित सोनवणे भैय्या माने
उपस्थित होते.