B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास अटक.
पारोळा –तालुक्यातील एका गावातील २२ वर्षे विवाहीत तरुणाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेले. त्या तरुणाविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी आज मंगळवारी ताब्यात घेतले आहे.
एका मजूर कुटुंबातील १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून परमदास धनराज पवार याने सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलीस पळवून नेले, तो मनमाड येथे गेला असल्याचे समजले. शौचास गेलेली मुलगी उशिरापर्यंत न परतल्याने आई-वडिलांनी शोध घेतला. त्याचवेळी संबंधित तरुण हा देखील घरी नसल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्या तरुणास फोन केला असता संबंधित मुलीवर माझे प्रेम आहे. आम्ही दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले. नातेवाईकांनी त्याला चाळीसगाव येथे भेटण्यासाठी बोलावले. मुलीला ताब्यात घेत त्याला पारोळा पोलिस ठाण्यात हजर केले. त्याची चौकशी केली असता तरुणाने मुलीसोबत वर्षभरापूर्वी तिच्याशी संबंध प्रस्थापित केल्याची माहिती पुढे आली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून परमदास पवार याच्याविरुद्ध बलात्कारसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.