B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

साहेब, ठिबक चे अनुदान द्या हो-महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांनकडे निवेदन च्या माध्यमातून मागणी

0


प्रतिनिधी:-साहेब गेल्या दोन वर्षापासून आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ठिबक व तुषार सिंचन चे अनुदान जमा झाले नाही,त्यामुळे आमचे अनुदान द्या हो अशी आर्त हाक महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी जळगाव येथे नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केली.
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, मी संघटनेचा संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेता म्हणून माझ्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला विनंती करू इच्छितो की जळगाव जिल्ह्यात आमच्या शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे म्हणून आम्ही क्रांती दिनाच्या दिवशी (दि.9/8/2024) रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासनाकडे मागण्या मान्य करण्याकरिता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा काढला होता,परंतु अदयाप पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.आपण जाणून आहात कि हा विषय फक्त जळगाव पुरता मर्यदित नसून पूर्ण राज्याचा आहे.
या आहेत संघटनेच्या मागण्या

  1. जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षाचे 8000 शेतकरी व 23-24 या वर्षातील 32 हजार 402 शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेतून आपल्या शेतात संच बसवले असून शासनाकडे अंदाजित 188 कोटी सबसिडी ची रक्कम घेणे बाकी असून ती त्वरित वर्ग करण्यात यावी.
  2. केंद्र पुरस्कृत ठिबक सिंचन योजना हि केंद्र व राज्य सरकार मिळून असून यात राज्याचा हिस्सा ६०% व मुख्यमंत्री श्वासवत निधी चा २५%हिस्सा एकत्रित करून या ची तशी तरतूद करून सदर निधी वितरीत करण्याच्या तात्काळ सूचना देण्यात याव्यात .
  3. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावीत.
    शासनाला प्रश्न उपस्थित केले आहेत
    आपण राज्यात लाडकी बहिण,लाडका भाऊ या योजना आणल्यात आपले अभिनंदन परंतु आपण आमचा शेतकऱ्याला सावत्रपणाची वागणूक देत असून आमच्या शेतकऱ्यांच्या मनात आपल्या विषयी रोष निर्माण होत आहे. तरी आपण लाडका शेतकरी कसा होणार ?याबाबत विचार करावा व आपल्या भाषणात हे सरकार सर्व सामान्याचे सरकार असल्याचे सांगत असतात,पण शेकऱ्यांच्या बाबतीत असे दिसुन येत नाही . तरी आपण आमच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी,न्यायासाठी,शेतकरी हितासाठी प्रयत्न कराल व वरीलप्रमाणे मागणी संदर्भात सूचना कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.