B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
शिवरे येथील शाळेत विद्यार्थ्यांना गणपती भंडाऱ्यात जेवणानंतर विषबाधा
पारोळा —
तालुक्यातील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक विद्यालय शिवरे येथे गणेश उत्सवणीमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केले त्यातून सुमारे 50 ते 60 विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या, चक्कर, मळमळ होणे, हातपाय गळणे आदी त्रास होऊ लागल्याने त्यांना लगेच शाळेतील शिक्षक व पालकांनी प्रथम तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तेथे प्रथम उपचार करून त्यांना जास्त त्रास होत असल्याने पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
शिवरे दिगर येथील स्वर्गीय वसंतराव जीभाऊ बहुउद्देशीय संस्था संचलित सारंग माध्यमिक विद्यालयात आज गणेश उत्सवा निमित्त सर्व शिक्षक व विद्यार्थी मिळून आज दिनांक 13 रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात वरण-भात गुलाब जामुन, मठची भाजी केलेली होती.ते जेवण सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी केले त्यानंतर काही तासातच साधारण चार वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना मळमळ चक्कर ई त्रास होऊ लागल्याने त्यांना तामसवाडी येथून पारोळा येथे हलविण्यात आले साधारण पाच वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते अन्नातूनच विषबाधा झाला असल्याचे समजते सुरुवातीला 20 ते 25 विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला त्यानंतर हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली साधारण 50 ते 60 विद्यार्थ्यांना या जेवनातून बाधा झाला आहे यांच्यावर पारोळा रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी कुटीर रुग्णालयात एकच गर्दी केली होती.
श्रुती कैलास बेलेकर ऐश्वर्या जगन महाले या दोन विद्यार्थिनींना धुळे येथे हलवण्यात आले.
विषबाधा झालेले विद्यार्थी नम्रता मच्छिंद्र कांडेकर, आरव्ही संभाजी पाटील, पूर्वी दीपक पाटील,धनश्री दीपक पाटील, दिव्या अमोल पाटील, कौशल्या भिकन जोगी( तरवाडे ), गायत्री जितेंद्र पाटील,मयुरी ईश्वर पाटील, प्रणाली सुभाष पाटील, तनुश्री प्रदीप पाटील, विशाल संजय निकम, कृष्णा प्रल्हाद पाटील, अंजली योगेश पाटील, पल्लवी विलास पाटील, जयेश ब्रिजलाल पाटील, राकेश किशोर पाटील, आदित्य गोरख कांडेकर, दिव्या उत्तम पाटील, दर्शना ब्रिजलाल पाटील, वेदांत बुराजी कांडेकर,कोमल समाधान पाटील, जगदीश अरुण पाटील, घनश्याम विठोबा पाटील, अक्षय विठोबा पाटील, घनश्याम निंबा पाटील, अक्षय निंबा पाटील, सागर अनिल भिल,अर्जुन महादराव पाटील, अश्विनी भिला शेळके, नंदिनी बारकू पाटील,माधुरी शेळके, प्रेरणा अनिल कोळी, चैताली माधवराव पाटील, वैष्णवी अशोक पाटील, भूषण डोंगर भिल, समाधान रवींद्र सरदार, साधना नारायण मिस्तरी, दुर्वेश आनंदा पाटील,जगदीश अरुण पाटील, कुणाल सुपडू बेलेकर, सोपान राजाराम भिल,कोमल समाधान पाटील, इत्यादी
या सर्व बालकांवर पारोळा कुटीर रुग्णालयातील व शहरातील खाजगी डॉक्टरांनी धाव घेतली व त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत रणाळे, डॉ. निखिल बोहरा, डॉ. कुणाल पाटील,डॉ सुनील पारोचे डॉ चेतन करोडपती, डॉ भुषण चव्हाण, डॉ वैशाली नेरकर, डॉ योगेंद्र पवार, डॉ. सुरेश पाटील,डॉ गोपाल शिंपी, डॉ पी जी पाटील, डॉ पुरुषोत्तम पाटील , डॉ मिलिंद श्राफ,डॉ. महेश पाटील,डॉ महेश पवार, डॉ गिरीश जोशी , डॉ महेश पाटील,डॉ. इशान जैन, डॉ. कुलदीप पवार, डॉ. हेमंत मराठे, शहरातील खासगी डॉक्टरांनी उपचार केले.
(यावेळी माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विचारपूस करत सरळ उपचार केले.) तर आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे बोलून सदर कुटीर रुग्णालयात डॉक्टरांची तसेच स्टॉप, वार्ड,वाढ करण्याची मागणी केली. व रुग्णांची विचारपूस केली
रुग्णालयात आमदार चिमणराव पाटील,माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील, डॉक्टर हर्षल माने, डॉक्टर संभाजी पाटील, प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड, समीर पाटील देवगाव सरपंच, प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते, शिवरे पोलीस पाटील तुकाराम पाटील,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील चंद्रकांत चौधरी पोलीस निरीक्षक सुनील पवार उपनिरीक्षक राजू जाधव तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी विचारपूस केली तर शहरातील अनेक डॉक्टर उपचारासाठी दाखल झाले होते.