B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळ्यात मतदान उत्साहात किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत
पारोळ्यात मतदान उत्साहात किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत
शहरासह तालुक्यात ६१ .६८ टक्के मतदान
पारोळा —
एरंडोल – पारोळा विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेबर रोजी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली यात सकाळी शहरासह तालुक्यातील मतदान केंद्रावर संथ गतीने मतदान सुरु झाले तर दुपारी काही ठिकाणच्या बुथ वर गर्दी दिसुन आली मात्र दुपारी ५ .१५ वाजता शहरातील अनेक बुथवर मतदाराच नसल्याने मतदान केंद्र ओस पडलेले दिसुन आले. तर एन ई एस हायस्कुलच्या ११८ व ११९ क्रमांकाच्या प्रत्येकी एका बुथवर पुरुष व महिलांच्या ५ वाजेनंतर रांगा लागल्याने तेथील मतदान ६ वाजेनंतरही सुरु होते . या वेळी पारोळा शहरासह तालुक्यात एकूण ६१ .६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला . तर पुनगांव येथे मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता .
पारोळा येथे एरंडोल विधानसभेसाठी सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली याप्रसंगी अनेक ठिकाणी सकाळी सात वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत मतदारां मध्ये उत्साह दिसुन आला नाही संथ गतीने सुरु झालेले मतदान दुपारनंतर मात्र अनेक मतदान केंद्रावर चांगली गर्दी दिसुन आली तर दुपारी ५ वाजेनंतर अनेक बुथवर फक्त अधिकारी बसून असल्याचे दिसून आले तसेच शहरासह अनेक मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ सतिश पाटील महायुतीचे उमेदवार अमोल पाटील , अपक्ष उमेदवार ऐ टी पाटील , डॉ हर्षल माने , डॉ संभाजीराजे पाटील यांनी शहरासह तालुक्यातील मतदान केंद्रावर भेटी दिल्या तर शहरात काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली याप्रसंगी निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार डॉ उल्हासराव देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सर्व मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता तर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक किशोर चव्हाण यांच्या वतीने सर्वच केंद्रांवर पाण्यापासून ते स्वच्छतागृह साफसफाई करून देण्यात आली होती.
.. दुपारी ५ वाजे पर्यंत ५८ .३६ टक्के मतदान…
एरंडोल विधान सभा मतदार संघात दुपारी ५ वाजे पर्यत ५८ . ३६ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसिलदार डॉ उल्हासराव देवरे यांनी दिली .
…सायंकाळी मतदान केंद्रावर रांगा ..
… ६ वाजेनंतर महिलाच्या रांगा ..
पारोळा शहरातील एन ई एस हायस्कुलच्या बुथ क्रमांक ११८ व त्या लगत असलेल्या बुथ क्रमांक ११९ वर मध्ये प्रत्येकी एका मतदान केंद्र वर . सायंकाळी ६ वाजल्या नंतर पुरुष व महिलांच्या मोठया रांगा लागल्याने संध्याकाळी ६ वाजेनंतर हि मतदानासाठी मोठा उत्साह बघावयास मिळाला . तर रांगे मध्ये असलेल्या मतदारांना टोकन देऊन मतदान शांततेत व सुरळीत मतदान सुरु होते .
….सेल्फी पॉईड ठरलं आकर्षण …
शहरातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर सेल्फी पॉईडची व्यवस्था करण्यात आली होती . मतदान झाल्या नंतर अनेकांनी सेल्फी काढून मी मतदान केलं .. तुम्ही करा असा संदेश सोशल मेडियावर पोस्ट करीत होते .विशेषता तरुण आणि तरुणीसाठी सेल्फी पॉईड आकर्षण ठरला.
.. पुनगांवकरांचा मतदानावर बहिष्कार …
दरम्यान पारोळा तालुक्यातील पुनगांव हे चार शे ते साडे चारशे लोकसंख्या असलेले गांव असुन या गावाला अदयाप सिमेंटचे रस्ते नाही , पाण्याच्या पाण्याचे हाल असुन नदीवरून पाणी पिण्या साठी आणावे लागत आहे . गेल्या अनेक वर्षापासुन मागणी करुनही काहि एक उपयोग होत नसल्याने अखेर आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकावा लागत असल्याची प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली . त्या ठिकाणी एक हि मतदाराने मतदान केले नसल्याने मतदाना साठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य घेऊन संध्याकाळी खाली हात यावं लागलं
… १५ मिनिट मशीन पडले बंद ..
तालुक्यातील करमाड बु . येथे विधानसभे साठी मतदान सुरु असताना सुमारे १५ मिनिटे व्हीव्हीपॅट मशीन बंद झाले होते त्या नंतर ते सुरु केल्याने मतदान पुन्हा सुरळीत सुरु झाले .