B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांचा दणदणीत विजय, 56332  मतांनी घेतले मतांधिक्य .पारोळा एरंडोल मध्ये दणदणीत विजयी रॅली.

0

महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांचा दणदणीत विजय, 56332  मतांनी घेतले मतांधिक्य .
पारोळा एरंडोल मध्ये दणदणीत विजयी रॅली.

पारोळा –एरंडोल मतदारसंघातील उमेदवारांची आज एरंडोल येथील म्हसावद रस्त्यावरील शासकीय आयटीआय मध्ये मतमोजणी करण्यात आली त्यात महायुतीचे शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे.
उमेदवारांना एकूण मिळालेली मते
डॉ. सतीश भास्कररावं पाटील:-44756
अमोल चिमणराव पाटील:-101088(विजयी )
प्रशांत पाटील:- 504, अमित दादा पाटील:-1703
अरुण रोहिदास जगताप :-204,सतीश भास्कर पवार (पाटील):-239 दत्तू रंगराव पाटील :- 126, ए टी नाना पाटील :-1576, भगवान आसाराम पाटील( महाजन):-41395, सुनील रमेश मोरे:-977, डॉ. संभाजीराजे पाटील :- 2845, स्वप्निल भगवान पाटील :-373, डॉ. हर्षल माने:-6373 अशी मते पडली असून अमोल चिमणराव पाटील हे 56 हजार 332 मताधिक्याने विजयी झाले असून त्यांची पारोळा व एरंडोल तालुक्यात विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी दोन डंपर भरून गुलाल व पाच ते सात जेसीबी आणून गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. दहाव्या फेरीपर्यंत डॉक्टर सतीश पाटील हे तीसऱ्या क्रमांकावर होते त्यानंतर भगवान महाजन यांनी काही भागात लीड घेत हे दुसऱ्या क्रमांकावर आलेत त्यानंतर डॉक्टर सतीश पाटील यांना काही भागात लीड मिळाल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर येऊन अपक्ष उमेदवार भगवान महाजन हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यानंतर अमोल चिमणराव पाटील हे एक नंबर वर तर सतीश भास्करराव पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार भगवान माने तिसऱ्या क्रमांकावर शेवटच्या फेरीपर्यंत चालत राहिले त्यानंतर कुठल्याही मतदार केंद्रावर कोणालाही अधिकचे मत न पडल्यामुळे अमोल चिमणराव पाटील यांना एक लाख दहा हजार 88 मते पडून 56 हजार 332 मताधिक्याने ते दणदणीत विजयी झाले. त्यांच्या या विजयाने एरंडोल तालुक्यासह कासोदा व पारोळा शहरात ढोल ताशांच्या गजरासह गुलाल उधळत एरंडोल पारोळा कासोदा येथे जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी मतदार संघातील प्रत्येक गाव खेड्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावात फटाके फोडून वाजत गाजत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.