B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळ्यात अवघ्या आठ दिवसांत स्वर्ग रथाचे लोकार्पण
पारोळ्यात अवघ्या आठ दिवसांत स्वर्ग रथाचे लोकार्पण
पारोळा
सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ्या आठ दिवसांत पारोळ्यात स्वर्ग रथाचे लोकार्पण करण्यात आले
याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरात अनेक दिवसांपासून स्वर्ग रथ न असल्याने तसेच शहराचा विस्तार झाल्याने अनेकांना दुरवरून चालत स्मशानभूमी गाठावी लागत असल्याने
अनेकांची कुचंबणा होत होती
या मुळे शहरात ठिकठिकाणी नाराजीचा सूर दिसुन येत होता परंतु कोणी ही पुढे येऊन यावर मार्ग काढत नव्हता याची जाण पारोळा शहरातील आरोग्य दुत डॉ योगेंद्र पवार यांनी ठेवत तसेच अनेकांशी विचार विमर्श करून यासाठी काही तरी उपाय योजना करावी म्हणून शहरातील विविध भागातील राजकीय सामाजिक व्यापारी यांचा एक स्वर्ग रथ नावाने सोशल मीडिया वर गृप तैय्यार करून दररोज या गृप च्या माध्यमातून या कार्यासाठी दान देण्याचे आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दात्यानी भरभरून दान दिले व अवघ्या आठच दिवसात शहरासाठी सर्व सुविधा युक्त स्वर्ग रथाचे लोकार्पण करण्यात आले या स्वर्ग रथात तिरडी डोली लोटा यासह खास सांऊड सिस्टीम ही लावण्यात आले आहे या स्वर्ग रथाचे सारथ्य करण्यासाठी शहरातील तीन तरूणांनी ज्यात नेहमीच सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असलेले ईश्वर बाबा ठाकुर,तर गौंरक्षक म्हणून प्रचलित असलेले समाधान धनगर, तसेच गौशाळेचे सेवेकरी विकास चौधरी, यांनी धुरा सांभाळली आहे, या स्वर्ग रथाचे आज महाशिवरात्री च्या पावन पर्वात शहरातील पुरातन काळापासून असलेल्या सिध्देश्वर महादेव मंदिराच्या आवारात करण्यात आले याप्रसंगी शहरातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते,मा नगरसेवक,व स्वर्ग रथासाठी ज्यांनी भरभरून देणगी दिली ते देणगीदार
यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे
या स्वर्ग रथासाठी ईश्वर ठाकुर मो, क्रमांक 7709934141
समाधान धनगर मो, क्रमांक 9765378038
विकास चौधरी मो, क्रमांक 9970507322
यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.