B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सरकारच्या लुटीच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारीअनिल घनवट:

0

पारोळ्यात स्वतंत्र भारत पक्षातर्फे शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र,

देशातील शेतकऱ्यांना चुकीच्या धोरणामुळे कर्जाच्या विळख्यातून मुक्त होऊ न देणारे धोरण अवलंबल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत, कोणत्याही पक्षाची शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटविण्यासाठी आयात निर्यातीचे धोरण व्यवस्थित पणे हाताळण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय असल्याचे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले, जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पारोळा येथे चर्चा सत्रात मार्गदर्शन करीत होते, कांदा प्रश्नांवर व कापूस प्रश्नांवर त्यांनी कडाडून टीका केली यावेळी प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे महिला आघाडीचे अध्यक्ष सीमाताई नरोडे व शेतकरी संघटनेचे विभाग प्रमुख शशिकांत भदाणे उपस्थित होते, अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले की, देशात व राज्यात राजकारणाची पातळी ढासळली आहे व विचारधारा कोणत्याही पक्षाला राहिली नसून सत्तेत राहण्यासाठी पक्ष फोडणे, व फोडाफोडीचे राजकारण करणे, परत सत्ता मिळविणे, सत्ता मिळवून पिढ्या खातील अशी संपत्ती जमा करणे याच्यात रस दिसून येत असल्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले, मार्गदर्शक अरविंद बोरसे यांनी आपण शेतकऱ्यांकडून कसा टॅक्स जमा होतो याबाबत सखोल अशी माहिती देत मार्गदर्शन केले,, व त्यांना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष सीमाताई नरोडे यांनी सुद्धा संबोधन करताना, शेतकरी कसा व किती लुटला जातो कायदा व सुव्यवस्था, ह्या विषयी त्यांनी उदाहरणासकट संबोधन केले भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला आहे एकही प्रस्थापित कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करू शकत नाही देशात कायद्याचे राज्य पुनर स्थापित करण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष बळकट करणे गरजेचे आहे व जानेवारीत आपण राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला, प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील कार्यकर्ता सक्षम होऊन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल व पक्ष बळकट करण्यासाठी कशा पद्धतीने आपण योगदान देऊ शकाल याविषयी ग्रामीण स्तरावरील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, मार्गदर्शन दौऱ्यात पारोळा येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख शशिकांत भदाणे, पूर्व जिल्हाध्यक्ष विभाग दगडू शेळके मार्गदर्शक अरविंद बोरसे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील पारोळा तालुका अध्यक्ष भिकनराव पाटील उपाध्यक्ष अनिल पाटील जगदीश मनोरे अनिल पाटील सुनील वानखेडे भिकन पाटील योगेश पाटील आडगाव तालुका अध्यक्ष दिलीप पाटील भागवत महाजन व जिल्ह्यातून इतर शेतकरी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.