B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळा राष्ट्रीय महामार्गावर आरटीओ ची कारवाई
पारोळा येथील राष्ट्रीय महामार्गावर चालणाऱ्या वाहनांवर जळगाव येथील आरटीओ पथकाने दंड आकारण्यात आला. यावेळी जळगाव येथील आरटीओ चे पथक पारोळा येथे विच खेड्या नजीक पिकप ट्रकचा अपघात झाला होता त्यात तीन महिला मरण पावल्या होत्या त्या तिहेरी अपघातातील वाहनांच्या तपासणीसाठी आले असता ती तपासणी पूर्ण झाल्यानंतर पारोळा शहरात महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेले तसेच लायसन्स कागदपत्रे पासिंग आदी कारणास्तव विटा, खडी, पेवर ब्लॉक, लोखंड व गॅस सिलेंडर वाहणाऱ्या अशा पाच वाहनांवर आरटीओ चे पथक सहायक मोटर वाहन निरीक्षक श्रद्धा महाजन सहायक मोटार वाहन निरीक्षक राहुल काळे वाहन चालक लक्ष्मण आगलावे यांनी कारवाई करून सुमारे दोन लाखाचा दंड वसूल करण्यात आला. सदर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी वाहनधारकांना विनाकारण त्रास देण्याचे काम करू नये कोरोना काळापासून वाहनांचे धंदे कमी झाले असून सदर वाहन चालकांनी वाहने हे कर्ज काढून विकत घेतलेली आहेत ते फेडणे नाकी नऊ येत असताना विनाकारण वाहनधारकांवर दंड आकारू नये अशी मागणी यावेळी वाहन धारकांनी केली आहे.