B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना लवकर द्यावा, स्व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना
पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना लवकर द्यावा, स्व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना
पारोळा येथील शरद जोशी प्रणित शेतकरी संघटने कडून पारोळा येथील तहसीलदार यांना निवेदन, 72 तासाच्या आत तक्रारींची नोंद पिक विमा कंपनीकडून घेतली जाते,, त्याप्रमाणे 72 तासाच्या आत शेतकऱ्यांना विमा कंपनी नुकसान भरपाई द्यावी,,. किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्व, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जळगाव, खरीप हंगाम 2023 ला जून पासून अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती सुरुवातीला अतिशय अल्प स्वरूपाचा पाऊस, नंतर सप्टेंबर 2023 मध्ये अतिवृष्टी, अशा भयावह व विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून समजले जाणारे व नगदी पीक म्हणून घेतले जाणारे कापूस पीक खूप धोक्यात आले त्याप्रमाणे मका ज्वारी बाजरी सोयाबीन उडीद मूग या सर्व पिकांच्या अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांनी घेतलेला पिक विमा त्यानुसार शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने तक्रारी दाखल केल्या , तदनंतर पिक विमा कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले, 72 तासाच्या आत तक्रारींना मुदत दिलेली असते, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पिक विमा नुकसानीचे अनुदान सुद्धा 72 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा कंपनीने जमा करावी, तसे झाल्याचे दिसून येत नसल्याने पिक विमा कंपनी सरकार , शासना साठी का शेतकऱ्यांसाठी असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगाम हा नुकसानीत गेल्याने आपण घेतलेला पिक विमा तरी मिळेल या आशेवर शेतकरी तगादा लावून बसलेला आहे, अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी त्याच्यात विमा कंपनीचा वेळ काढू पणा व शासनाची उदासीनता, दिरंगाई अशा तिहेरी दृष्ट चक्र व अशा दुष्ट चक्रात सापडलेला शेतकरी आम्हाला न्याय मिळेल का असे भावुक उदगार शेतकऱ्यांकडून काढले जात आहे, सध्याच्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांनी कर्ज काढून उसनवारी करून शेतात केलेला खर्च निघत नसल्याने शेतकरी चिंता क्रांत झालेला आहे त्याने जगावे की मरावे असा यक्ष प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकलेला आहे शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना प्रोत्साहन पर अनुदान व दोन लाखावरील थकीत कर्जदार शेतकरी यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशा मागण्या स्व, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पारोळा कडून करण्यात आलेले आहेत मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने केलेला आहे, वरील निवेदन नायब तहसीलदार, श्री शिरसाट यांना देण्यात आले, यावेळी शेतकरी संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष, किशोर पाटील तसेच पारोळा तालुका अध्यक्ष प्रा, भिकनराव पाटील सर उपाध्यक्ष अनिल पाटील चिटणीस गुलाब पाटील संघटक भागवत महाजन गणेश पाटील विकास पाटील सुमेर सिंग राजपूत इस्माईल बेलदार अशोक पाटील मनोज सरदार भूषण महाजन प्रवीण महाजन जितेंद्र पाटील बाबाजी पाटील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते