B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून परिचित चोरवड यात्रेस दिनांक २५ पासून सुरुवात.
पारोळा .तालुक्यातील दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून परिचित चोर वड यात्रेस सोमवार म्हणजे दिनांक २५ पासून सुरुवात होत आहे.मार्गशीर्ष महिन्यात सदर यात्रेस विशेष महत्व असून मागील ४०० वर्षा पासून सदर यात्रेची परंपरा असून पारोळा पासून १३ किमी अंतरावर सदर गाव असून गावाच्या पश्चिम दिशेला श्री दत्त महाराज यांचे पुरातन मंदिर एक लहान व एक मोठे मांदिर असून दोन्ही मंदिरात ई.स १६०२ मध्ये दत्ताची मूर्ती स्थापन केल्याचा इतिहास आहे ,महानुभाव पंथाचे एकमुखी दत्ताचे हे खानदेशात एकमेव स्थान असून दहा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी लाखो भक्त पूर्ण राज्यातून येथे मुक्कामी येत असतात . या यात्रेसाठी पारोळा बस विभागाकडून अनेक विशेष बसेस सोडल्या जातात त्या मुळे भक्तांची प्रचंड गर्दी यात्रेत दिसून येते.असे असले तरी चोर वड लगत असलेली भोंडन ,पोपत नगर,मंगरूळ ,वलवॉडी आदी परिसरातील नागरिक आजही बैल गाडीवर सह कुटुंब येणे पसंद करतात .झुले पाळणे खाद्य पदार्थांची रेलचेल… आठ दिवस चालणाऱ्या सदर यात्रेसाठी झुले पाळणे, करमणूकी साठी विविध स्टॉल ,खाद्य पदार्थांच्या गाड्या सजल्या आहेत.यात्रेत्येनाऱ्या भाविकांना सरपंच राकेश पाटील यांच्या सह ग्रा. प.सदस्य पोलिस पाटील,ग्रामसेवक तलाठी यांचे सहकार्य लाभत असते.असा आहे मंदिराचा इतिहास ..येथील रावजी बुवा यांच्या झोळीत आलेल्या फुलांचे रूपांतर दत्ताच्या मूर्तीत आल्याची आख्यायिका सर्वश्रुत आहे यात मोठे दत्त मंदिर १५० वर्ष छत नसताना उभे होते त्या नंतर एकाच रात्रीत सदर छत बांधले गेल्याचे ग्रामस्थ सांगतात.तर लाहांन मंदिरा शेजारी औदुंबराचे झाड असून यात्रा दरम्यान भूत ,पिछाच यांचे डोक्यावरील उरे औदुंबरास बांधली जातात असा मोठा इतिहास या मंदिराचा असून जिथे सायन्स थांबते तिथे दुवा सुरू होते असा विश्वास पंचक्रोशीतील भक्त गणांचा आजही टिकून असल्याने लाखो भक्तांची मांदियाळी यात्रा दरम्यान दिसून येते.