B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळा तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावीशरद जोशी शेतकरी संघटने कडून निवेदन काल रात्री झालेल्या अवकाळी पाऊस ,गारपीट ,वादळ, हवेचा जोर, यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने तहसील व कृषी विभाग यांना निवेदन दिले यावर्षी खरीप हंगामापासून ते रब्बी हंगामा पर्यंत शेतकऱ्यांना अस्मानी संकटाने हा धरून सोडलेले असून शेतकरी असा जगेल असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या, तसेच काल रात्री झालेल्या पावसाने वादळाने हवेच्या वेगाने ज्वारी बाजरी मका गहू हरभरा लिंबूवर्गीय फळ पिके पपई टरबूज,, तसेच शेतावर बसवलेले सौर ऊर्जा पंप च्या प्लेट्स एकंदरीत शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे , पिकांसाठी अहो रात्र जेमतेम पाणी असलेल्या विहिरी तळ गाठलेल्या विहिरी जेवढे पाणी तेवढे पिकांना देत असलेला शेतकरी परंतु डोळ्यासमोर स्वप्नांची राख रांगोळी झालेली परिस्थिती शेतकऱ्यांसमोर दिसत आहे खरीप हंगाम वाया गेला तसाच रब्बी हंगाम आसमानी संकटांनी हिरावून घेतला सरकार शासन यांनी लक्ष घालून शेतकरी कसा उभा राहील यासाठी तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी,, खरीप हंगामाचा प्रलंबित कापूस पिक विमा अजून शेतकऱ्यांपर्यंत मिळालेला नाही त्यात अतिवृष्टीचा पंचनामे सुद्धा झाले तो लाभ सुद्धा मिळालेला नसून आता रब्बी हंगामाचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल का असा प्रश्न शेतकरी वर्गांमध्ये कुजबूज करताना दिसत आहे हवेच्या प्रचंड वेगाने ज्वारी बाजरी मका लिंबू शेवगा पपई जमीनदोस्त झाल्याचे दिसत आहेत शेवगे प्र, बहाळ येथे सौर ऊर्जा पंप यांच्या प्लेट्स श्री रोहित रोहिदास पाटील, प्रतिभा रोहिदास पाटील, रोहिदास श्रीराम पाटील यांचे सौर ऊर्जा पंप तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे सौर ऊर्जा पंप उडून दुसऱ्या ठिकाणी पडलेले दिसून येत आहेत सदर तात्काळ कार्यवाही होऊन शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा लाभ मिळावा यासाठी स्व शरद जोशी शेतकरी संघटना पारोळा च्या वतीने कृषी विभाग भामरे व नायब तहसीलदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शांताराम पाटील महेश पाटील छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय पाटील प्रताप पाटील भागवत पाटील मच्छिंद्र पाटील विकास पाटील चतुर पाटील संभाजी पाटील रवींद्र पाटील तुकाराम पाटील आनंदा पाटील भूषण पाटील गुलाब पाटील रवींद्र पाटील इत्यादी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते