B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भोले गृप व चालक मालक संघटनेतर्फे रक्तदान शिबीर

0

कासोदा….,,( सुरेश ठाकरे ,)महाशिवरात्रीनिमित्त येथील जय भोले गृप व चालक मालक संघटना तर्फे महेश मंदिर येथे काल दि. ७ मार्च रोजी महेश मंदिरात २५ फुट उंच त्रिशूलची स्थापना विधीवत सोळा जोडप्यांच्या हस्ते अजय जोशी, सुधीर जोशी व प्रसाद जोशी यांनी शास्त्रोक्त पध्दतीने पुजा करण्यात आली. तसेच आज दि. ८ मार्च २०२४ रोजी सकाळी काकडारती व दहा वाजल्यापासून बारा ते पंधरा क्विंटल साबुदाणा फराळाचे व चहाचे वाटप करण्यात आले. तसेच जय भोले गृप व चालक मालक संघटनेतर्फे रक्तदान शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जीवन ज्योती ब्लड सेंटर व रक्त विघटन प्रयोगशाळा धुळे यांच्या कर्मचाऱ्यांकडून रक्त संकलन करण्यात आले. यात एकूण पंचवीस नागरिकांनी रक्तदान केले.
    तसेच महेश मंदिराचे बाजूलाच असलेल्या श्रीस्वामी समर्थ केंद्रात सकाळी महारुद्राभिषेक व काकड आरती करण्यात आली.
तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्र कासोदा यानी या ठिकाणी असलेल्या जागेत बारा ज्योतिर्लिंगाची बारा जोडप्यांचे हस्ते आरती करुन उद्घाटन करण्यात आले. या परिसराला जणू यात्रेचे स्वरूप आले होते. या सर्व कार्यक्रमांसाठी गावातील भाविक मोठया संख्येने परिश्रम घेत होते. या कार्यक्रमास कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी उपस्थित देत आयोजकांनी केलेल्या कार्याचे कौतुक करत उत्कृष्ट असे आयोजन केले व ओम शांती केन्द्र कासोदा यांनी बारा ज्योतिर्लिंगाची मांडणी चांगल्या प्रकारे केल्याने त्यांचे देखील कौतुक केले. गावातील भाविकांना एकाच ठिकाणीं बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडत आहे हे गावासाठी चांगले कार्य आहे.
त्यानंतर ओम शांती केन्द्र कासोदा यांचे तर्फे शिवलिंग पुजन करुन त्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकीत केंद्रातील सर्व भक्तगण व गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याच प्रमाणे गावातील सर्व महादेव मंदिरात महाशिवरात्री
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रत्येक मंदिरात भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात होती.

Leave A Reply

Your email address will not be published.