B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळा — बहादरपुर ता. पारोळा रस्त्याचे काम सध्यस्थीतीत सुरु आहे. काम अगदी नित्कृष्ठ दर्जाचे होत असून ठेकेदाराचा मनमानी कारभाराकडे जबाबदार अधिकाऱ्यांना पहायला वेळ मिळत नसल्याचा आरोप लोकांनी केला आहे.भिलाली फाटा ते बहादरपुर रस्त्याचे डांबरीकरण सुरु आहे. मात्र या रस्त्यावर खडी योग्य प्रमाणात न वापरता साईडपट्ट्या खोल न करता रस्त्याच्या बाजूला माती लगत डांबर टाकीत काम सुरु आहे. परिणामी काम झाले आहे. ग्रामस्थांनी रस्त्याच्या साईड पट्ट्या वरील डांबर हाताने निघून जात असल्याचा प्रकार समोर असून हा रस्ता किती दिवस टिकेल अशीही शंका व्यक्त होत आहे.या रस्त्याचे डांबरीकरण अशा पद्धतीने होत असताना संबधित अधिकारी का दुर्लक्ष करीत आहेत. का मुद्दाम दुर्लक्ष करीत असून त्यांना कुंभकर्ण झोपेचे सोंग घेतले आहे. असाही प्रश्न उपस्थित झाला असून लोकप्रतिनिधी लक्ष घालतील का? पारोळा-बहादरपुर, मोंढाळे- बहादरपुर आणि जिराळी- इंधवे- बहादरपुर, बहादरपुर अंमळनेर ह्या रस्त्यावरिल कामाच्या दर्जाबाबत काम करणारे रोड बांधकाम व्यावसायिक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या लक्षात आणून द्यावे लागेल, नाहीतर नाईलाजाने काम बंद करून आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. असा पवित्त्रा ग्रामस्थांनी घेतला असून कामचुकार अधिकऱ्यावर कारवाई करावी असाही सुर उमटत आहे.