B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रोहयोच्या जलसंधारण कामातून गाव होईल पाणीदार “`मनरेगातून दुष्काळ नि

0

_रोहयोच्या जलसंधारण कामातून गाव होईल पाणीदार_ “`मनरेगातून दुष्काळ निवारण उपक्रमात खेडीढोक येथे रोहयोबाबत मार्गदर्शन“`

पारोळा –तालुक्यातील खेडीढोक येथे मनरेगातून दुष्काळ निवारण या उपक्रमा अंतर्गत हनुमान मंदीरात पाणीटंचाईग्रस्त गावात ग्राम रोजगार दिवस घेण्यात आला. या वेळी दुष्काळी भागात रोजगार हमीचे महत्व व घेता येणारी कामे याबाबत माहिती देण्यात आली. रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाची कामे घेऊन गाव पाणीदार व टँकर मुक्त करणे या उपक्रमाचा उद्देश आहे. रोहयोमुळे रोजगाराची हमी सोबत गावात शाश्वत संसाधनाची निर्मिती करता येते. तलावातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, बांधबंधिस्ती, वनबंधारे, रोपवाटिका, वृक्षलागवड, सलग समतल चर, फळबाग, शेततळे, परसबाग अशी कामे घेतल्याने भूगर्भात पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होते, जास्तीतजास्त ग्रामस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशदा प्रशिक्षक व जनसहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन नेरकर यांनी केले. कामांची मागणी, जॉब कार्ड, मजुरी भत्ता याबाबत ग्रामसेविका मनीषा भामरे यांनी तर संतुलित व सकस आहारासाठी परसबागचे महत्व सेंद्रिय शेतीतज्ञ भरतसिंग राजपूत यांनी माहिती दिली. या वेळी उपस्थितांनी जलसंधारणाशी निगडित कामाची गरज असल्याचे सांगून गाव शिवारात नाला व तलावातील गाळ काढणे, वृक्षारोपण, खड्डे खोदणे, मातीबांध, विहीर पुनर्भरण बांधबंधिस्ती आदी कामे घेण्यावर भर दिला. या उपक्रमासाठी तांत्रिक मार्गदर्शन प्रगती अभियान नाशिक यांचे लाभले. कार्यक्रमास सरपंच उज्ज्वला गोरख भिल, उपसरपंच वैशाली गणसिंग राजपूत, ग्राम रोजगारसेवक प्रदीप राजपूत, विकासो सदस्य तुकाराम मैराळे, हिमत पाटील, राजू पाटील, नरसिंग पाटील,बापू पाटील,तुळशिराम पाटील, युवराज पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, सतेसिंग पाटील,बचत गटांच्या महिला व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.