B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळ्यात जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात मिरवणुकीत सर्वधर्मीयांकडून मंगल आरती विश्वशांतीसाठी मंत्रपठण
पारोळा – विश्वाला जगा व जगू द्याचे संदेश देणारे अहिंसेचे महानपुजारी जैन धर्मीयाचे २४ वे अंतीम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा दि २१ एप्रिल रविवार रोजी २६२३ वा जन्मकल्याणक महा महोत्सव दिना निमित्त शहराच्या प्रमुख भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्या शोभायात्रेकडे पारोळेकरांचे लक्ष वेधले गेले. त्या प्रसंगी सर्वधामियांकडून मंगल आरती ओवाळून स्वागत केले. काही भक्त गण आपल्या दारातूनच भगवान महावीर स्वामींना वंदन करून आपली भावना व्यक्त करीत होते. मिरवणुक मार्गक्रमण करित असता. अधून मधून भक्तगण भगवान महावीर स्वामींचा तसेच आचार्य विद्यासागरजी मुनिश्रीचा आणि . गौरव असलेले तपस्वीवृन्दांचा जयघोषाने नगरी गजबजली होती. जैन ट्रस्टी ,
जैन नवयुवक , जैन महिला मंडळ , समाज बांधव व भागीनी यांच्या सहकार्याने मंगलमय वातावरणात विविध धार्मिक संपन्न झाले . मिरवणुकीची शोभायात्रेची सांगता दिगंबर जैन वाडी मध्ये करण्यात आली .
.
चौकट …..
भगवान महावीर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या रथा मध्ये महावीरजीची प्रतिमा विरजमान करण्यात आली होती . ठिकठिकाणी प्रतिमेची आरती करण्या साठी भाविकांनी एकच गर्दी केली होती .. रथा ला ओढण्यासाठी व आरतीचे पुजन करण्यासाठी भगवे वस्त्र परिधान केलेल्या ( सोहळ्या मधील ) यानाच परवानागी होती .