B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
शिक्षिका सौ. वनमाला पवार, यांचा नागरिक सत्कार संपन्न..
पारोळा..
तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या वरीष्ठ शिक्षिकासौ. वनमाला( बाळासाहेब) माधवराव पवार ह्या त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत मोंढाळे,बोदर्डे,(वंजारीखु: ) महाराणा प्रताप नगर येथील ग्रामस्थांनी त्यांचा नुकताच नागरी सत्कार केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी संचालक चतुर अण्णा पाटील होते. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी गटशिक्षणाधिकारी जे. के. पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बंडू नाना वाणी, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, पोलीस निरीक्षक सुनील पवार, तरवाडे गो शाळेचे संत रविदास महाराज, माजी नगराध्यक्ष दयाराम बळीराम पाटील,माजी नगरसेवक भीमराव जावळे, दौलतराव पाटील, सचिन पाटील, दिपक गिरासे, डॉ. शांताराम दाजीबा पाटील, डॉ. संभाजीराजे पाटील, संतोष रामसिंग राजपूत नाशिक, रणजीतसिंग महेंद्रसिंग राजपूत नाशिक यांचे सह असंख्य ग्रामस्थ, शिक्षक वृंद उपस्थित होते. सौ.वनमाला पवार या शैक्षणिक क्षेत्रासोबत सार्वजनिक क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. त्या बोदर्डे- वंजारी ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. मोंढाळेप्र.अ. ग्रामस्थांच्या सुखदुःखात त्या नेहमी सहभागी होत असतं. त्यांचा मराठी हा स्पेशल विषय असल्याने त्यांना मराठी मॅडम म्हणून देखील त्यांचे विद्यार्थी ओळखत होते.
या ऋणनिर्देश सोहळ्यास दोन ते अडीच हजार ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दिली हीच त्यांच्या कार्याची खरी पावती होय.