B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळा गेल्या कित्येक वर्षापासुन प्रलंबित असणारा नारपार गिरणा प्रकल्प हा आजही अनुत्तरित आहे. या प्रकल्पात खान्देशातील लोकप्रतिनिधी पाहिजे ती भूमिका न घेतल्याने दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न हा बिकट होत असताना हा प्रकल्प खान्देश तसेच जळगाव जिल्हा किती दिवस तहानलेला असेल याचेही उत्तर आज नाही. या प्रकल्पाच्या मागणीसाठी पारोळा येथील डॉ. संभाजीराजे पाटील आता मैदानात उतरल्याचे दिसत आहे. शेतकरी आणि काही अभ्यासकांना घेऊन डॉ. संभाजीराजे पाटील पोहोचले थेट नारपरच्या दऱ्याखोऱ्यात.
नाशिक जिल्ह्यात पेठ आणि सुरगाना या भागात सह्याद्रीचे काही खोरे आहेत. या खोऱ्यांमध्ये सात नद्यांचा उगम होतो. शिवाय त्याठिकाणी केम नावाचा डोंगर आहे. त्या डोंगराच्या परिसरात भारतातील चेरापुंजीनंतर सर्वात जास्त तीन ते साडे तीन हजार मीनी पाऊस पडतो. याच खोऱ्यांमध्ये नारपार, दमनगंगा, मांजरपाडा, औरंगा, अंबिका आणि इतर अशा एकूण सात नद्या उगम पावतात. या मुख्य नंद्यांच्या अनेक उपनद्यादेखील आहेत. या सर्व नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन दिव-दमन जवळ समुद्राला जाऊन मिळतात. या खोऱ्यांमध्ये साधारणत: 165 ते 170 टीएमसी जलसंपत्ती आहे.
नारपार, दमनगंगा या पश्चिमवाहिनी नद्या पूर्ववाहिनी केल्यास यातील वाया जाणारे व समुद्राकडे वाहून जाणारे पाणी, दुर्भिक्ष असलेल्या गिरणा खोर्याकडे वळवल्यास सुमारे 160 टीएमसी पाणी उपलब्ध होऊन नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणासह पुनोद प्रकल्प, चणकापूर, ठेंगोळा लघुधरण, जळगाव जिल्ह्यातील जामदा बंधारा, दहिवद बंधारा, लमांजन बंधारा यांच्यासह जिल्ह्यासह जिल्ह्यातील इतर बंधारे उदा. तामसवाडी धरण, अंजनी धरण, म्हसवे तलाव, भोकरबारी, खोलसर लघुधरण, भालगाव, खडकेसिम लघुधरण आदी प्रकल्प १०० टक्के भरून त्यातून जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यातील सुमारे 82,800 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून दु:खी, कष्टी व दुष्काळात होरपळणार्या शेतकर्यास दिलासा मिळणार आहे.
फक्त शेती आणि पिण्याचा नव्हे तर औद्योगिक वसाहत, छोटे उद्योग यालाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे.“नारपार खोऱ्यातील पाणी हे उत्तर महाराष्ट्राचं शेवटचं जलस्तोत्र आहे. हे पाणी जर उत्तर महाराष्ट्राला नाही मिळालं तर येणाऱ्या दहा वर्षाच्या आत उत्तर महाराष्ट्राचं वाळवंट होईल. त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्राची शेती, उद्योग, रोजगार या तीन प्रमुख गोष्टींवर होईल. हा प्रकल्प स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे झाला नसला तरी आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा कृतीतून या प्रकल्प पूर्तीसाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे डॉ संभाजीराजे पाटील. खरी समस्या सोडविण्यासाठी समस्यांपर्यंत पोहोचावं लागत यासाठीच नारपार खोऱ्यात प्रत्यक्ष पाहणी दौरा करून माहिती घेतली, सरकार पर्यंत हा विषय पोहोचवला देखील असून या मागणीसाठी मोठा लढा उभारावा लागला तरी चालेल आणि यासाठी जनतेने देखील काम करणाऱ्याच्या मागे खंबीर उभे राहावे असे आवाहन देखील डॉ संभाजीराजे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघातील समस्या यावर अभ्यास सुरु असताना या समस्या सोडवू शकतो असा ठाम विश्वास आहे, पारंपरिक राजकारण, आरोप प्रत्यारोप न करता, जनतेत जाऊन या गरजेच्या विषयासाठी आता फक्त काम करणार आणि मतदार संघातील शेतकरी, व्यापारी, तरुण, महिला यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी कायम प्रयत्नशील राहणार. डॉ संभाजीराजे पाटील.