B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

टायगर इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा निमित्ताने गुरुवंदन

0

पारोळा (दि.२१ जुलै) पारोळा, तालुक्यातील कासोदा रस्ता लागत असलेल्या टायगर इंटरनॅशनल स्कूल मध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा निमित्ताने अभिवादन करण्यात आले, तसेच जागतिक बुद्धिबळ दिनाच्या निमित्ताने स्पोर्ट कोच अभिषेक सिंघ यांनी विद्यार्थ्यांना बुद्धिबळाच्या खेळाचे प्रशिक्षण दिले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कासोदा रस्त्यालगत असलेल्या, टायगर इंटरनॅशनल स्कूलच्या, वर्ग पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यास मुनी यांच्या जयंती निमित्ताने आज सर्व विद्यार्थ्यांनी ग्रुरु चे महत्व व भाग्य समजून सांगितले गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध उद्याच्या माध्यमातून आज वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात गुरुचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे हे आपल्या भाषणातून व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शितल वाघ यांनी केले असून प्रस्तावना ऍडमिनिस्ट्रेशन विश्वास पाटील यांनी मांडली या समयी कार्यक्रमात टायगर इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष रविंद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील प्राचार्य, श्रीनिवास राव, अजीम शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी, ऍडमिनिस्टेड विश्वास पाटील, विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर, वृषाली पाटील, क्लार्क श्रीकांत खैरनार, सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिप्ती पाठक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काजल सिंधी, दिपिका कटेकर, मनिषा नंदुरबारे या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.