B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जलजीवन योजना व सार्वजनिक सुविधांपासून सावखेडे. वंचित

0

जलजीवन योजना व सार्वजनिक सुविधांपासून सावखेडे तुर्क गाव
वंचित- सुनील रामोशी

पारोळ्यात पत्रकार परिषदेत आंदोलनाचा इशारा
पारोळा

राष्ट्रीय महामार्ग 53 वर सावखेडे तुर्क गाव आहे. मात्र सार्वजनिक सोयी आणि सुविधांपासून गाव वंचित राहत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते सुनील रामोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवत
गावातील जलजीवन योजना फक्त कागदावर राबवली जात आहे.
तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून
गावाचा सोयी सुविधांबाबत विचार होत नसल्याची खंत व्यक्त करत
गावातील जलजीवन योजना व सार्वजनिक सुविधा उपलब्ध न झाल्यास ग्रामस्थांच्या मदतीने महामार्गावर व्यापक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
तारीख 20 रोजी पारोळा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते लीलाधर पाटील, नितीन पाटील, विनोद मराठे उपस्थित होते.
श्री रामोशी पत्रकार परिषदेत म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गालगतच ग्रामपंचायत सावखेडे तुर्क गाव आहे.
त्यामुळे गावालगत अद्याप प्रवाशांसाठी बस थांबा नाही, मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग असतांना देखील गावालगत कुठल्याही प्रकारचा पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करून झालेली नाही,
गाव महामार्ग लगत असताना देखील पथदीप नसल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही, अद्याप पर्यंत गावाचे दिशादर्शक फलक देखील नसल्यामुळे ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असल्याची ते म्हणाले.
राष्ट्रीय महामार्गावरचे पावसाचे पाणी नजीकच्या शाळेत शिरत असल्यामुळे
चारही महिने आता ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागणार आहे, पथदिप नसल्यामुळे भरधाव वाहणाऱ्या वाहनांमुळे
अपघाताची दाट शक्यता असून रात्रीच्या वेळेस गावकरी भयभित होऊन रस्ता ओलांडू शकत नाहीत
त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
यांनी गावाच्या सार्वजनिक सुविधांचा विचार करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
चौकट-…
गावातील जलजीवन मिशन कागदावर
येथील जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करणे कामी संबंधित ठेकेदाराला मागील दोन वर्षापासून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे सदरील ठेकेदारांचा वारंवार पाठपुरावा करून सुद्धा गावात सदरील नमूद कामास सुरुवात झाली नसल्याचे सुनील रामोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
वारंवार पाठपुरावा करून मागील तीन महिन्याआधी संबंधित ठेकेदाराने पाण्याच्या टाकीसाठी अंगणवाडी परिसरात खड्डे केले .
मात्र परिसरात शैक्षणिक संस्था असून अंगणवाडीतील तसेच शाळेतील लहान बालकांचा या ठिकाणी नेहमी संपर्क असतो त्यामुळे खड्डा बऱ्यापैकी खोल असून त्या ठिकाणी लहान बालके पडून त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो ठेकेदाराने फक्त आपल्या आर्थिक लाभापोटी प्रत्यक्षात कुठलेही काम केले नसून कागदावर काम दाखवत बिल पारित झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे
योजना मंजूर होऊन सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून गावातील नागरिक पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जात आहे.
करिता संबंधित जलजीवन योजने अंतर्गत कामाची चौकशी व्हावी
अशी मागणी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे केली आहे.
याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास
ग्रामस्थांसोबत ते आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.