B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळा येथील बापू मंडप डेकोरेटर्स चे संचालक बापू कुंभार हे “उद्योग रत्न” पुरस्काराने सन्मानित
धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचा विद्यार्थी गुणगौरव व समाज भुषण कार्यक्रमात पारोळा येथील 1980 पासून मंडप डेकोरेटर व केटरिंग व्यवसायात असणारे श्री.बापू नथु कुंभार हे धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास व सैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात एक रुपया ही न घेता सर्व मंडप डेकोरेटर्स व केटरिंग दर वर्षी ते फक्त कुंभार समाजासाठी मोफत उपलब्ध करून देतात, त्यांचे वडील कै. नथु खंडू कुंभार हे मातीकाम व मूर्तिकार होते त्यांच्या वडिलांपासूनच त्यांना समाज कार्य करण्याची आवड निर्माण झाली. तो वसा आणि वारसा आजही बापू कुंभार यांनी जपला. बापू कुंभार हे फक्त आपलाच समाजासाठी नाही तर इतर समाजासाठीही धावपळ करतात, तसेच ते खान्देशात प्रसिद्ध अशा पारोळा येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिर अन्नछत्र चॅरिटेबल ट्रस्ट व महाप्रसाद समितीचे विश्वस्त आहेत. भगवान बालाजींच्या 15 दिवस चालणाऱ्या ब्रम्होत्सव यात्रेत साऊंड सिस्टीम व लायटिंगची ते गेल्या 25 पासून दर वर्षी मोफत सेवा पुरवतात. तसेच ते दर वर्षी बाबा बर्फानी अर्थात भगवान अमरनाथ यात्रेचे देखील आयोजन करत असतात, आता पर्यंत हजारो भाविकांना त्यांनी भगवान अमरनाथांचे दर्शन घडवून आणले आहे. मंडप डेकोरेटर्स व केटरिंग व्यवसायात “बापू मंडपवाले” म्हणून त्यांचे नांव संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध आहे.या कामात त्यांना त्यांचे दोन्ही बंधू आणि त्यांचे पूर्ण जगदाळे परिवाराचं ही मोठ पाठबळ मिळत असतं. व्यवसाया बरोबरच सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या व धार्मिक कार्य करणाऱ्या अशा या दात्याचा व त्यांच्या कार्याचा कुठेतरी गौरव व्हावा म्हणून खान्देश कुंभार समाज विकास व सैक्षणिक संस्थेने त्याची “उद्योग रत्न” पुरस्कारा साठी त्यांची निवड केली. आज त्यांचा धुळे जिल्हा परिषद कर्मचारी भवन धुळे येथे कुंभार समाजाचां विद्यार्थी गुणगौरव व समाजभूषण कार्यक्रमाच्या दिमाखदार सोहळयात विशेष असा “उद्योगरत्न” पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमचे नेते मार्गदर्शक धुळे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री.सुरेशजी बहाळकर, श्री.संजयजी जोरले ओबीसी मोर्चा,जेष्ठ नेते श्री.उमाजी सुर्यवंशी. छत्रपती संभाजीनगर, आभोणा येथील श्री.सोमनाथ शेठ कुंभार जिल्हाध्यक्ष नाशिक, श्री.रमाकांतजी क्षीरसागर नाशिक, श्री.भगवान सुर्यवंशी मुंबई, श्री. चंद्रशेखरजी कापडे जिल्हाध्यक्ष जळगांव, श्री.सुभाष कुंभार जिल्हा कार्याध्यक्ष शिरपूर, श्री.गोकुळ कुंभार शिरपूर ता. अध्यक्ष, इत्यादी नेते उपस्थित होते.