B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नंदुरबार | आश्रमशाळेत चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू…?

0

ऑनलाईन B24NEWS टीम :- नंदुरबार जिल्ह्यातील तळोजा तालुक्यातील अलिविहीर येथील शासकीय आश्रमशाळेत चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अलिविहीर येथे आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रम शाळा आहे.येथील इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा झोपेत असतानाच मृत्यू झाला आहे.तमन्ना बाज्या बसावे (८) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तमन्ना ही मध्यरात्री बाथरूमला गेली होती. त्यानंतर ती झोपी गेली. सकाळी ती उठलीच नाही. तिला रुग्णवाहिकेतून तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले. तिचा संशयितरित्या मृत्यू झाला असून मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे मात्र अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दि. २५ रात्री 9 वाजता आश्रमशाळेत प्रार्थना घेण्यात आली. यावेळी प्रार्थनेला तिही उपस्थित होती. तिने रात्रीचे जेवणही केले. त्यानंतर ती झोपी गेली. तिच्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे, मध्यरात्री ती बाथरूमसाठीही गेली होती. दरम्यान सकाळी प्रार्थना होत असताना तमन्ना दिसली नाही. त्यामुळे गृहपालांनी तिच्या वसतिगृहात जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती हालचाल करत नसल्याचे दिसून आले. तिला तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.