B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळा येथील व्यावसायीकाची ७६,३०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक
पारोळा येथील व्यावसायीकाची ७६,३०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक
पारोळा – शहरातील एका इलेक्ट्रिकल्स व्यावसायीकास ७६,३०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.याबाबत आज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा येथील भरतसिंग अजबसिंग गिरासे यांचे श्रीराम इलेक्ट्रिकल्स दुकान आहे.त्यांनी दि.२१ ऑक्टोंबर २०२१ रोजी सिंपल एनजी प्राईव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गुगल वेबसाईडवर स्कुटी बुकींगसाठी फॉर्म भरला होता.त्यावेळी १९४७ रुपये ऑनलाईन बुकींग चलन भरले. त्यानंतर सदर कंपनीच्या ऑफिस मध्ये फोन करून विचारपुस केली असता त्यांना स्कुटीची लॉन्चींग उशिरा होणार असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर दि.२० ऑक्टोंबर २०२३ रोजी त्यांनी दुपारी साडेअकराच्या सुमारास मोबाईलवर सिंपल एनर्जी वन या कंपनीची वेबसाईड शोधली असता त्यांना ७५८६८४६९८३ असा नंबर मिळाला,त्यावर फोन करुन त्यांनी बुक केलेली स्कूटी बाबत विचारणा केली असता तुम्हाला थोडया वेळात दुसऱ्या नंबरवरुन फोन येईल असे सांगीतले.थोडया वेळाने त्यांना ८२४०६०४२९५ यावरुन फोन आला व आपकी स्कुटी ८ दिन में डिलिव्हरी हो जाएगी,आपको में अकाऊंड नंबर देता हूँ उसमे आप अभी २० हजार रुपये डाल दो असे सांगितल्यावर त्यांनी आपल्या फोन पे वरुन २० हजार रु टाकले.त्यानंतर पुन्हा दोन तासांनी त्याच नंबर वरून त्यांना फोन आला व तुमची स्कूटी पॅक होऊन ती डिलिवरी साठी गाडीमध्ये लोड केली आहे तुम्ही आर टी ओ पासिंग साठी ३२ हजार पाचशे रु पाठवा ही रक्कम ही रिफंड होईल असे सांगितले. तसेच परत २३ हजार आठशे रु ट्रान्सफोर्ट चार्ज टाकुन द्या ही रक्कम सुध्दा रिफंड होईल असे सांगितल्यावर असे एकूण ७६ हजार तीनशे रुपये त्यांनी पाठविल्यावर त्यांनी याबाबत भाचा प्रितमसिंग राजपुत याचाशी चर्चा केली असता यावेळी सदर कंपनीच्या कस्टमर केअर नंबर व साईट तपासल्यावर भरतसिंग गिरासे यांना आपली ऑनलाइन फेसबुक झाल्याचे लक्षात आले.दरम्यान,याबाबत त्यांनी २१ ऑक्टोंबर २०२३ रोजी ऑनलाईन सायबर क्राईम कडे तक्रार नोंदविली होती तसेच बँकेला अर्ज ही केला होता.परंतु पैसे अद्याप परत न मिळाल्याने आज दि.५ रोजी गिरासे यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहे.