B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हिमोफेलीया ग्रस्त रुग्णांची हेळसांड थांबले का ?

0

हिमोफेलीया ग्रस्त रुग्णांची हेळसांड थांबले का ?

पारोळा –हिमोफेलीया हा अती दुर्मिळ असा आजार असून या आजाराने ग्रस्त जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात जवळपास २०० च्या वर रुग्ण असून हे सर्व रुग्ण योग्य व वेळेवर उपचारा पासून वंचित आहेत या रुग्णांची हेळसांड थांबले का असा प्रश्न या विभागाचे सचिव स्वप्निल पाटील यांनी केला आहे शासन दरबारी वेळोवेळी निवेदने देऊन मागणी करुन देखील कोणतीही दखल घेतली जात नाही या रोगामुळे रुग्णांना अपंगत्व येते तसेच एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यास त्याला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो या रूग्णांना नेहमीच फॅक्टर ८ फॅक्टर ९ आणि तसेच इनहिबिटर रूग्णां साठी फिबा व नोवो ७ इंजेक्शन ची आवश्यकता असते या औषधाचा साठा अगदी मर्यादित उपलब्ध होत असल्याने रूग्णांची हेळसांड होत असते ऐनवेळी दुखापत झाल्यास रूग्णांचे रक्त थांबत नाही म्हणून धावपळ करावी लागते जवळपास या तिन्ही जिल्ह्यांत कूठे ही या रूग्णांना औषधोपचार मिळत नाही त्यांना ऐनवेळी धावपळ करत नाशिक किंवा मुंबई गाठावी लागते इतक्या लांब रुग्णांना घेऊन जाता एकाध्याचा जिव देखील जाऊ शकतो आणि अश्या घटना घडल्या देखील आहेत तसेच केंद्र सरकारच्या वतीने या रूग्णांना मोफत औषधोपचार दिले जातात परंतु या तिन्ही जिल्ह्यांत कूठे हि या रुग्णांसाठी स्वतंत्र यंत्रणा किवा विभाग कार्यान्वित नाही असे स्वप्नील पाटील यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले म्हणून या रूग्णां साठी जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात केंद्र सरकारच्या निदर्शा नुसार वेगळे विभाग करून व नेहमीत लागणार्या औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून सुविधा मिळाव्यात अशी मागणी हिमोफेलीया सोसायटीच्या वतीने सचिव स्वप्निल पाटील यांच्या सह या व्याधीग्रस्त रूग्णांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.