B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे पत्रकार दिन, पत्रकार बांधवां सोबत उत्साहात साजरा.

0

बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे पत्रकार दिन, पत्रकार बांधवां सोबत उत्साहात साजरा.
पारोळा शहरातील एकमेव सीबीएसई बोहरा सेंट्रल स्कूल येथे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन हा पारोळा शहरातील सर्व पत्रकारांसोबत साजरा करण्यात आला. शाळेचे चेअरमन श्री सुरेंद्र जी बोहरा, डायरेक्टर श्वेता बोहरा, प्रिन्सिपल शोभा सोनी मॅडम ऍडमिनिस्टर वीरेंद्र सखा सर, प्रसंगी उपस्थित पत्रकार बांधव व पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष व शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व फुलमाळा अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या लोकशाहीचे स्तंभ म्हणून गणले जाणारे पत्रकार बांधव, त्यांचे वृत्तपत्राच्या माध्यमातून होणारे जनजागृती व समाजसेवा व अन्याय विरोधात घेतली जाणारी दखल इत्यादी सर्व गोष्टींसाठी त्यांचे हे अमूल्य असे असे आपल्या देशा प्रतीचे योगदान पाहता त्यांच्या या कार्याचे कौतुक म्हणून या पत्रकार दिनाचे औचित्य साधून बोहरा शाळेत, संस्थेचे चेअरमन सुरेंद्रजी बोहरा यांच्या हस्ते शहरातील सर्व पत्रकार बांधवांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या गौरव सोहळ्यात श्रेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, भूपेंद्र मराठे, भिकाभाऊ चौधरी, विजय नावरकर, अभय पाटील, योगेश पाटील, रमेश जैन, दिलीप सोनार, अशोक कुमार ललवाणी, विशाल महाजन, दीपक भावसार, बाळू पाटील, प्रदीप पाटील, प्रतीक मराठे, बापू वाडीले,प्रकाश पाटील, सुनील महाजन, राकेश शिंदे, जितेंद्र वानखेडे, विश्वास चौधरी इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने, शाळेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा व प्राचार्य शोभा सोनी मॅडम यांचे सर्व पत्रकारांच्या वतीने पत्रकार बांधवांच्या केलेल्या या सन्मान सत्कारा साठी आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.