B24NEWSLIVE
B24NEWSLIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अपंगाच्या प्रमाणपत्रासाठी दिव्यांग बांधवांची फिर फिर

0

अपंगाच्या प्रमाणपत्रासाठी दिव्यांग बांधवांची फिर फिर

पारोळा गेल्या चार-पाच महिन्यापासून जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील दिव्यांग विभाग येथील डॉक्टरांकडून अपंगात्वांना अपंगाचे प्रमाणपत्रासाठी फिर फिर व तारीख पे तारीख सुरू आहे यासंदर्भात अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील व शहरातील काही अपंगाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले अनेक अपंग बांधव यांनी जळगाव येथील सिविल हॉस्पिटल येथे दिव्यांग विभाग 102/202 या रूम मध्ये जाऊन अपंगत्वाची तपासणी केली व त्यात ते शासनाच्या नियमाप्रमाणे व अटी शर्तीनुसार ते अपंग ठरले तसे त्यांना कळविण्यात देखील आले आहे परंतु प्रमाणपत्र ते ऑनलाईन व व्हाट्सअप वर पाठवू तुम्ही तिकडे काढून घ्या असे उत्तर संबंधित डॉक्टरांकडून अनेक वेळा मिळाले यासंदर्भात अपंगत्वांनी अनेक वेळा विचारणा केली असता गेल्या चार-पाच महिन्यापासून पाठवू काम सुरू आहे ऑनलाइन तुम्ही काढून घ्या व्हाट्सअप ने पाठवू तुम्ही इथे या अनेक अपंग बांधव जळगाव येथे गेल्यावर देखील त्यांना ते संबंधित डॉक्टरांनी अपंगाचे प्रमाणपत्र दिले नाही यावेळी अनेक अपंग बांधवांची निराशा झाली यात पायाच्या अपंग हाताचे अपंग डोळ्यासंदर्भात तक्रारी असलेले काही अपंग कर्णबधिर असे रुग्ण चे प्रमाणपत्र जळगाव सिविल हॉस्पिटल चे दिव्यांग विभाग कडे चकरा मारीत आहेत या संदर्भात वरिष्ठांनी दखल घेऊन अपंगांना त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पारोळा तालुक्यातील व शहरातील दिव्यांग बांधवांनी केलेली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.