B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पारोळा l येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त टायगर इनोवेशन फेअर आयोजित करण्यात आला तसेच उद्योजकतेला वाव देण्यासाठी इंटरप्रीनियर माईंड स्टेट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि फूड स्टॉल्स लावण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी श्री विश्वास पाटील, गटशिक्षणाधिकारी पारोळा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री चंद्रकांत चौधरी शालेय पोषण आहार अधिकारी पारोळा, श्री सचिन पाटील तालुका अध्यक्ष टीडीएस उपस्थित होते, तसेच अतिथी पत्रकार श्री भूपेंद्र मराठे वरिष्ठ पत्रकार लोकमत, श्री भिका चौधरी संपादक पारोळा भूषण, श्री अभय पाटील पत्रकार दिव्य मराठी, बी 24 न्यूज संपादक. बाळू एस पाटील.अशोक नलवाणी पत्रकार लोकशाही, श्री राकेश शिंदे पत्रकार लोकमत, श्री प्रकाश पाटील पत्रकार महाराष्ट्र सारथी, श्री विशाल महाजन पत्रकार तरुण भारत हे उपस्थित होते यावेळी शाळेचे संस्थापक श्री रविंद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील, प्राचार्य अजीम शेख, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी मुख्य व्यवस्थापक मंगेश पवार, वरिष्ठ शिक्षक विवेक माळी, शितल अकॅडमी चे प्राचार्य विशाल पाटील, पी.टी.ए. चेअरमन विनोद पाटील, पी.टी.ए. मेंबर्स उपस्थित होते. इनोव्हेशन फेअर मध्ये सीनियर केजी ते इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स जसे की पवनचक्की, हायड्रोलिक प्रेशर चा वापर करून चंद्रयान, घर सफाईसाठी व्याक्युम पंप यांचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून उद्योजकते विषयी आवड निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी स्टॉल्स लावण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी घर सुशोभीकरणाच्या वस्तू तसेच तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी वस्तू स्वतः बनवून त्या विकल्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालक जे व्यवसाय करतात त्यांचे देखील फूड स्टॉल्स लावण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विक्री कशी केली जाते याचा अनुभव घेतला. कारण विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेऊन फक्त चांगली नोकरीच करायची ही विचारसरणी बदलण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्या देशाला विकसित राष्ट्र होण्यासाठी नवीन उद्योजकांची साथ लागेलच त्याशिवाय हे स्वप्न साकार होणार नाही म्हणून टायगर इंटरनॅशनल स्कूल या दिशेने प्रयत्न करीत आहे. आलेल्या अतिथींनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच लहान वयातच विद्यार्थ्यांना विज्ञान आणि उद्योजकडे दिशा दाखवण्यासाठी शाळेचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन, सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले