B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
पुणे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांना बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स, लंदन व लायन क्लब ऑफ पुणे अग्रसेन यांच्या वतीने London Book of Records पुरस्कार हा सामाजिक क्षेत्रात १२ वर्षापासून काम करत असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला. अमळनेर शहरातील साप्ताहिक उदयकाळ वृत्तपत्राचे संपादक मा. श्री. बाळकृष्ण बागुल यांचे जेष्ठ चिरंजीव मा. मयुर बाळकृष्ण बागुल (समाजकार्य) ह्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत असून पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. सदरील पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उच्चपदावर कार्य करणारे प्रतिनिधी यांची निवड समिती गठीत करून पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरस्कार स्वीकारतांना मयुर बागुल यांनी सांगितले कुटुंबात सामजिक संस्कार घडल्यामुळे आपण समाजचे देणे लागतो. स्वता पुरता जीवन जगत असतांना आपण दुसऱ्यांच्या देखील विचार केला पाहिजे. देशात व समाजत प्रगती घडवायची असेल तर निसंकोच पणे कार्य केले पाहिजे. जिद्द व इच्छाशक्ती असल्याने त्यांचे कार्य वाढत आहे. समाजकार्य क्षेत्रात गेली १२ वर्षापासून विविध सामजिक संस्था ह्यांच्या सोबत काम करत असतांना विशेषतः ग्रामीण भागात काम करण्याची गरज आहे. या उद्देशाने त्यांनी ८ वर्षापासून ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सबलीकरण व कोविड मधील एकल महिलांसाठी विविध उपक्रम सुरु केले. लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंडस ते माजी अध्यक्ष, खजिनदार म्हणून काम केले असून ते सध्या क्लबच्या कार्यकारणी मध्ये काम करत आहे.
समाजात बदल व परिवर्तन घडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणत कार्यारत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होणे अपेक्षित होते. पुरस्कार स्वीकारतांना हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेऊन सोबत कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे. कुठलेच कार्य पुरस्कार घेण्यासाठी करत नाही परंतु आपल्यावर लोकांचा विश्वास असल्याने व समाजात चांगले परिवर्तन व बदल घडवून आणण्याची अपेक्षा असते. त्यामुळे पुरस्कार घेऊन अधिक जबाबदारीने कार्य करण्यास पाठबळ मिळते.
हा पुरस्कार सोहळा दि. ५ मे २०२४ रोजी पुणे शहरातील Symbiosis International School येथे पार पडला. पुणे शहरातील माजी आमदार मा. जगदीश मुळीक, ला. रवी अग्रवाल, ला. राजेश बन्सल, ला. परमानंद शर्मा या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.